वाशिम पोलिसांचा दणका जिल्हयातील दुकान फोडणारे बाहेर जिल्हयातील अटल गुन्हेगार
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम पोलिसांचा दणका जिल्हयातील दुकान फोडणारे बाहेर जिल्हयातील अटल गुन्हेगार यांचे ताब्यातुन १ चारचाकी वाहन व चोरी केलेला मुद्देमाल एकुण किंमत ७,१८,७४०/- जप्त.
वाशिम पोलिसांचा दणका जिल्हयातील दुकान फोडणारे बाहेर जिल्हयातील अटल गुन्हेगार यांचे ताब्यातुन १ चारचाकी वाहन व चोरी केलेला मुद्देमाल एकुण किंमत ७,१८,७४०/- जप्त केला.
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता दिवस/रात्री गस्त वाढवुन पोलीसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक कायम ठेवला आहे. वाशिम जिल्हयात दिवसेदिवस दुकान फोडण्याचे प्रमाण वाढीस लागले होते.
दिनांक १३/०२/२०२२ रोजी फिर्यादी गजानन श्रीराम खरबळ रा रिसोड यांचे रिपोर्ट वरून पोस्ट रिसोड येथे अपन १००/२२ कलम ४६१.३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास वेगवेगळ्या ठिकाणी गस्त वाढवून माहिती काढण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोपनिय माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) जुला सोहीलमिया जुला बासीद वय २७ वर्षे स ताज नगर दिग्रस जि यवतमाळ २) शफीक उर्फ सरफराज मोमीन अलीम मोमीन वय ३३ वर्षे रा कळय जि उस्मानाबाद यांना साफळा रचुन ताब्यात घेतले व विचारपुस केली असता त्यांनी त्याचा साथीदार) शेख फारूख शेख हज्जु रा कळंब जि उस्मानाबाद व नष्पड उर्फ रईस स माजलगाव बीड यांनी मिळून रिसोड, शेलू बाजार व मालेगाव येथील दुकाने फोडुन लाखो रुपयाचा मुददेमाल चोरून नेला होता त्यांनी वाशिम जिल्हयातील १) पो स्टे रिसोड अप के १०० / २२ कलम ४६१.३८० भादवी २) पो स्टे मंगरूळपीर अप क ६१ / २२ कलम ४६१,३८० भादवी ३) पो स्टे मालेगांव अप क ३६ / २२ कलम ४६१,३८० भादवी प्रमाणे तिन दाखल गुन्हयाची कबुली देवून सदर तिन्ही गुन्हयात चोरी गेलेला तांबा तार व पीसो वायर, बॅट-या व गुन्हयात वापरलेले कार असा एकुण किमत ७,१८,७४०/- रूपये चा मुददेमाल आरोपीताकडुन जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी व मुददेमाल पोलीस स्टेशन रिसोड यांचे ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन रिसोड हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चनसिंह अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम याचे पथकातील सपोनि अतुल मोहनकर पोहवा सुनिल पवार, संतोष कंकाळ पोना अमोल इंगोले, राजेश गिरी, प्रशांत राजगुरु, राजेश राठोड, अश्विन जाधव पोकॉ अविनाश वाढे, संतोष शेनकुडे, गजानन गोटे, दिगांबर मोरे यांनी सहभाग नोंदविला.
0 Response to "वाशिम पोलिसांचा दणका जिल्हयातील दुकान फोडणारे बाहेर जिल्हयातील अटल गुन्हेगार "
Post a Comment