-->

भूमिपुत्र ची रिसोड कृ.उ.बा  समीतीच्या प्रशासकांसोबत बैठक

भूमिपुत्र ची रिसोड कृ.उ.बा समीतीच्या प्रशासकांसोबत बैठक


साप्ताहिक सागर आदित्य/
भूमिपुत्र ची रिसोड कृ.उ.बा  समीतीच्या प्रशासकांसोबत बैठक

रिसोड - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतक्यात  हळदीची प्रचंड आवक वाढलेली  आहे. रिसोड, मालेगांव, वाशिम, लोणार, मेहकर, जिंतूर, सेनगाव तालुक्यातील हळद रिसोड मार्केटला येत आहे. हर्रासी, काटा, पेमेंट व इतर अडचणी बाबत शेतकऱ्यांच्या  सातत्याने फोन वरून तक्रारी येत आसल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले. रिसोड बाजार समितीत भूमिपुत्रच्या प्रयत्नानेच हळद खरेदी सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्याने आवक वाढतच आहे.  आपुर्या पायाभूत सुविधां मुळे शेतकरी आणि प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, डाॅ.जितेंद्र गवळी, रविंद्र जाधव, धोंडु तिरके, विलास पाटील, विनायक देशमुख यांच्यासह हळद ओट्यावर भेट दिली.  शेतकऱ्यांच्या समस्यां व कृ.उ.बा. समीती प्रशासना कडुन शेतकऱ्यांच्या आपेक्षा जाणून घेऊन कृ.उ.बा. समितीचे प्रशासक व रिसोड चे सहायक निबंधक सहकरी संस्था मा.  बन्सोड साहेब, कृ.उ.बा.समितीचे सचिव देशमुख यांच्या सोबत भूमिपुत्र ची बैठक संपन्न झाली. झालेल्या बैठकीत हळदीचे शेड दोन्ही बाजुने वाढवने, हळद शेड कडे जाणारा रस्ता व शेडच्या बाजुचे काँक्रिट करणे, शेतकऱ्यांचे हळदिचे पेमेंट आठ दिवसांत देणे, हळद खरेदी दारांची संख्या वाढवणे व पीण्याचे पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे बैठकीत ठरले. ठरल्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे प्रशासक  महेंद्र बनसोड यांनी मान्य केले व पावसाळ्या पुर्वी कामे करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आसल्याचे सांगीतले.
 बैठकीसाठी व्यापारी गोपालभाउ काबरा, पुरूषोत्तम तोष्णीवाल, पप्पु हेंद्रे आडते शेषराव खरात यांच्यासह भूमिपुत्र चे पदाधिकारी , कार्यकर्ते, हळद विक्रीसाठी आलेले शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

0 Response to "भूमिपुत्र ची रिसोड कृ.उ.बा समीतीच्या प्रशासकांसोबत बैठक"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article