पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम - पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू , प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडगे यांनी निर्भया पथकाचा उद्देश, कार्यप्रणाली आणि कामगिरीबाबतची माहिती यावेळी दिली.
पालकमंत्री यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आगमन होताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी देसाई यांनी सेवा कक्षाचे फीत कापून उद्घाटन केले.या कक्षात ड्युटीवर असलेल्या कर्मचारी पुष्पा मनवर आणि कोमल गाडे यांचेकडून तक्रारदार/पीडितेच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेऊन कशाप्रकारे तक्रारदाराचे समाधान करण्यात येते तसेच आतापर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्यात याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.
कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम,अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी मालेगाव थानेदार किरण वानखेडे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन खंदारे, नायब पोलिस कॉन्स्टेबल गजानन शिंदे यांचेसह अन्य पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी, नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरीक्षक भारत लसंते यांनी केले.उपस्थितांचे आभार सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांनी मानले.
0 Response to "पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार"
Post a Comment