जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
वाशिम - जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कोविड रुग्ण संख्येत घट झाली आहे. अलीकडच्या काही दिवसात जिल्ह्यात कोविड रुग्ण आढळून आलेले नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी जारी केले आहे.
जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-१९ विषाणू आजाराचा प्रसार मागील काही वर्षात सर्वत्र झाल्याने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले. या आदेशाने विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले होते. मागील काही कालावधीपासून जिल्ह्यात कोविड -१९ रुग्ण संख्येत घट झाली आहे. जिल्ह्याच्या लसीकरणाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्य शासनाने ३१ मार्च २०२२ रोजी काढलेल्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व त्या अनुषंगिक कायद्यान्वये लावण्यात आलेले विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक सर्व निर्बंध १ एप्रिल २०२२ पासून मागे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी जारी केले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागाकरिता यापूर्वी लागू करण्यात आले कोविड-१९ संबंधित सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश १ एप्रिल २०२२ पासून रद्द करण्यात आले आहे.
कोविड - १९ बाबत असलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क परिधान करणे ऐच्छिक असून सामाजिक अंतर राखण्याबाबत तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही लसीचे डोज घेतले नसल्यास त्यांनी तात्काळ घ्यावे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस यांनी आदेशात म्हटले आहे.
0 Response to "जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश "
Post a Comment