नाम फाउंडेशन अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रति लाभार्थी 25000 हजार रुपये धनादेश
वाशिम - नाम फाउंडेशन अंतर्गत रिसोड तालुक्यातील 21 वाशिम व तालुक्यातील 9 अशा एकूण 30आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम खान्देश प्रमुख हरीष दादा इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड व वाशिम तालुक्यातील 30 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रति लाभार्थी 25000 हजार रुपये प्रमाणे धनादेशाद्वारे मदत कुटुंबांना करण्यात आली यावेळी नामचे जिल्हा समन्वयक डॉक्टर अश्विन सुरूशे व तहसीलदार शेलार व नायब तहसीलदार बनसोड, कृषी अधिकारी घोलप मॅडम, यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेश वाटप करण्यात आले या वेळीं नामच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अश्विन सुरूशे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर भागवत यांनी केले.
0 Response to "नाम फाउंडेशन अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रति लाभार्थी 25000 हजार रुपये धनादेश"
Post a Comment