मौजे भट उमरा येथे संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह.
साप्ताहिक सागर आदित्य/
मौजे भट उमरा येथे संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह.
वाशिम - येथून जवळच असलेल्या भट उमरा या गावात संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले (दिनांक२७/३/२०२२ वार रविवार) ला प्रारंभ झालेल्या सप्ताहामध्ये भागवताचार्य हरिभक्त परायण कैलास महाराज काळे (भट उमरा) यांच्या सुमधुर वाणीतुन गावकरी मंडळी व तसेच सर्व हरी भक्त यांनी कथेचा आनंद घेतला.
मनुष्यमात्राची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी व परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून श्रीमद् भागवत महापुराण संगीत कथेचे आयोजन करण्यात आले
भागवताचार्य हरिभक्त परायण कैलास महाराज काळे. यांना साथ देण्यासाठी ((तबला वादक; गणेश महाराज आळंदी, ऑर्गन वादक ; गायक रमेश महाराज शिंदे पिंपरी)
सप्ताहामध्ये सकाळी काकडा भजन , नंतर नगर प्रदक्षणा असायचे व नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर गावकरी मंडळी फुगड्यांचा आनंद घ्यायचे, दुपारी भागवत कथा भागवत कथा झाल्यानंतर हरिपाठ व संध्याकाळी दररोज हरी किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सप्ता मधील रोजचे कीर्तनकार हे (ह.भ.प. रामेश्वर महाराज गुंड विनोदाचार्य शिरपूरकर जिल्हा जालना, ह.भ.प. निवृत्ती महाराज वाडेकर शिवचरित्रकार संभाजीनगर, ह.भ.प. अनिल महाराज चेके बुलढाणा, ह.भ प. सागर महाराज परिसकर वाशिम, ह.भ.प. उत्तरेश्वर महाराज विनोदाचार्य आळंदी देवाची, ह.भ.प. रामेश्वर महाराज उगले काजलंबा, ह.भ.प. सुनील महाराज घायाळ गोभणी,
व तसेच काल्याचे किर्तन ह.भ.प. वामन महाराज जागरण म.)
असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे कार्यक्रमाची विनीत : जगद्गुरु तुकोबाराय भजनी मंडळ,समस्त गावकरी मंडळी व जय बजरंग नवयुवक मंडळ भट उमरा.
श्रीमद्भागवत कथेचे पुजारी म्हणून श्री नरहरी शिवराम काळे व साऊंड सिस्टम गोवर्धन धोटे दूध खेडा
अखंड चालत आलेला हा हरिनाम सप्ताहाचे पेरणास्थान ह.भ.प. स्वर्गीय किसन महाराज काळे व तसेच वैकुंठवासी भागवताचार्य सदाशिव महाराज काळे
गेले सात दिवस चालत आलेला हा संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक ३/४/२०२२ वार रविवारला करण्यात आले
या दिवशी काल्याचे किर्तन ह.भ.प. वामन महाराज जांभरुण महाली यांचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले पंचकोशीतील समस्त ग्रामस्थांनी किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
0 Response to "मौजे भट उमरा येथे संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह. "
Post a Comment