-->

बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प वाशिम अन्तर्गत सर्व अंगणवाडी क्षेत्रांमध्ये पोषण पखवाडा

बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प वाशिम अन्तर्गत सर्व अंगणवाडी क्षेत्रांमध्ये पोषण पखवाडा




साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम - बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प वाशिम या कार्यालयांतर्गत सर्व अंगणवाडी क्षेत्रांमध्ये पोषण पखवाडा २१ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे तसेच आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार २१ ते २७ मार्च स्वस्थ बालबालिका स्पर्धा मध्ये सर्व बालकांची वजन उंची घेण्यात आली व त्याची नोंद पोषण ट्रॅक्टरवर करण्यात आली स्वस्त बालक बालिका यांचा गौरव करण्यात येऊन कुपोषित कमी वजनांच्या बालकांना वजन वाढविण्यासाठी स्पेशल सीबीइक कार्यक्रमाच्या माध्यमातून माता व पालकांना पौष्टिक आहार विविध पाककृती यांचे मुलांच्या वजन वाढीतील योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच गृहभेटी च्या माध्यमातून त्यांच्यावर सेविका लक्ष ठेवून आहेत तसेच या वेळी पोषण पखवाडा अंतर्गत कार्यक्रम केवळ पोषणा पुरतेच मर्यादित न ठेवता जीवनाच्या इतर आवश्यक पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे त्याअंतर्गत २८ व २९ मार्च दोन हजार बावीस या दोन दिवशी महिलांची पाणी वापरा संदर्भातील वाचविण्या संदर्भातील भूमिका व महत्त्व पाणी अडवा पाणी जिरवा याकरिता महिला तसेच कुटुंबातील सर्व व्यक्ती वैयक्तिक पातळीवर करू शकणारे प्रयत्न याविषयी जनजागृती अंगणवाडी अंतर्गत कार्यक्रम व गृहभेटी द्वारे करण्यात आली तसेच पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवडीचे आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात आले ३० मार्च ते १ एप्रिल पर्यंत गरोदर स्तनदा माता किशोरी मुली शाळेत जाणारी मुले यांच्यातील ॲनिमिया प्रतिबंध करण्याकरिता आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार पौष्टिक व संतुलित आहाराचे महत्व सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यात येत आहे ॲनिमिया रोखण्यासाठी फार महागड्या आहाराची आवश्यकता नाही तर जो आहार आपण नियमित घेतो तोच संतुलित कसा असावा या विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे तसेच २ व ३  एप्रिल ला अंगणवाडी केंद्रामध्ये विविध पारंपारिक पौष्टिक पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे चार तारखेला पोषण पखवाडा कार्यक्रमाचा समारोप सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे तरी सर्वसामान्य जनतेला या कार्यक्रमा मध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन शासनाचे उपक्रम आणि सुपोषित भारताचे उद्दिष्ट यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





0 Response to "बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प वाशिम अन्तर्गत सर्व अंगणवाडी क्षेत्रांमध्ये पोषण पखवाडा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article