
श्री.पांडुरंग विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.पांडुरंग विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
पिंपळा ता.मालेगाव येथील श्री पांडुरंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दिनांक ०६ डिसेंबर २०२२रोजी महामानव,बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून जी.एम.कांबळे सर हे उपस्थित होते.सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते महामानव, बोधीसत्व,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भीम गीत तसेच विविध प्रकारचे विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ई.गवळी सर तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.डी.भिंगे,आभार प्रदर्शन जी.डी कोरडे सर यांनी केले.
कार्यक्रमाला वर्ग ५ वी ते १२ वीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Response to "श्री.पांडुरंग विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा "
Post a Comment