-->

आत्महत्यामुक्त गाव करण्यासाठी प्रतिष्ठित व संवेदनशील नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे             जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आत्महत्यामुक्त गाव करण्यासाठी प्रतिष्ठित व संवेदनशील नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



 साप्ताहिक सागर आदित्य 

आत्महत्यामुक्त गाव करण्यासाठी प्रतिष्ठित व संवेदनशील नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे

           जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


वाशिम, जिल्हयात शेतकरी आत्महत्या हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने अनेक सामाजिक परिणाम जाणवतात. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या कुटूंबातील सदस्यांना विविध हलाखीच्या परिस्थीतींना सामोरे जावे लागते.शेतकरी आत्महत्या होऊ नये,यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी संवेदनशीलतेने एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.

             शेतकऱ्याची आत्महत्या होणारच नाही,यासाठी गावातील प्रतिष्ठित व संवेदनशील नागरीकांचा व गावातील शासनाच्या वतीने काम करणाऱ्या विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असलेला कार्यगट तयार करण्यात येत आहे.या कार्यगटाने गावात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही,यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी विचारविनिमय करणे आणि आत्महत्येच्या उंबरठयावर आलेल्या व्यक्तीबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी समन्वय साधणे व समन्वयातून आपले गाव आत्महत्यामुक्त करणे यासारखी विविध कामे सामाजिक जाणिवेतून करणे अपेक्षित आहे.

        गावातील प्रतिष्ठित व सामाजिक जाणीव असलेल्या नागरीकांना या कार्यगटात कार्यरत होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.तरी आपला सहभाग नोंदवून आत्महत्यामुक्त गाव हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपला सहभाग नोंदविण्यासाठी गावातील तलाठयांकडे आपली नावे कळवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.  

                    

0 Response to "आत्महत्यामुक्त गाव करण्यासाठी प्रतिष्ठित व संवेदनशील नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article