
भारत प्राथमिक मराठी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा
रिसोड : भारत प्राथमिक मराठी शाळेत 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी किरणताई दुबे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की "समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ह्या मानवी मूल्यांवर आधारित आधुनिक समाज निर्माण करणे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे खरे उद्दिष्ट होते. आज महपरिनिर्वान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अंगीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल" असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक पंजाबराव देशमुख,ज्योतीताई दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राहुल मोरे यांनी केले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा "
Post a Comment