-->

सहकार विभाग - पदभरती   परीक्षा प्रवेशपत्राबाबत सूचना

सहकार विभाग - पदभरती परीक्षा प्रवेशपत्राबाबत सूचना

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सहकार विभाग - पदभरती 

परीक्षा प्रवेशपत्राबाबत सूचना 

वाशिम, सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता  ० ६ जूलै २०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहीरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.या कंपनीमार्फत १४ व  १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत.तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करावयची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांना याव्दारे आवाहन करण्यात येते की,वरील संकेस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येतांना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी.तसेच प्रवेशपत्रात नमूद सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक

सहकारी संस्था वाशिम यांनी केले आहे.

Related Posts

0 Response to "सहकार विभाग - पदभरती परीक्षा प्रवेशपत्राबाबत सूचना "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article