
घरकुल, स्वच्छ भारत योजनेची कामे तातडीने करा: अरुण मोहोड
साप्ताहिक सागर आदित्य
मेरी मिट्टी- मेरा देश अभियानाचा आढावा:
घरकुल, स्वच्छ भारत योजनेची कामे तातडीने करा: अरुण मोहोड
मंगरुळपीर:दिनांक १० ऑगस्ट
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरुण मोहोड यांनी मेरी मिट्टी- मेरा देश या अभियानाचा गावनिहाय आढावा घेऊन सर्व ग्राम पंचायतीमध्ये 'अमृत रोप वाटिका' तयार करण्याचे निर्देश दिले.
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेले बैठकित पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर, विस्तार अधिकारी (पंचायत) बाळकृष्ण अवगण, जिल्हा परिषदेचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ राम श्रृंगारे, आरोग्य सहायक दत्ता माहुलकर यांची उपस्थिती होती.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासानाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त मेरी मिट्टी, मेरा देश हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिनांक 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान सर्व गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. त्याप्रमाणे मंगरुळपीर तालुक्यातील सर्व गावात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याबाबत ग्रामसेवकांमार्फत आढावा घेऊन गटविकास अधिकारी मोहोड यांनी काही सुचना दिल्या. त्याअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत दिनांक ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध प्रकारचे पाच उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये 'वसुधा वंदन' उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील योग्य ठिकाण निवडून ७५ देशी वृक्षांची लागवड करून "अमृत रोप वाटिका' तयार करण्याचे निर्देश बिडिओ अरुण मोहोड यांनी दिले.
घरकुल, स्वच्छ भारत योजनेची कामे तातडीने करा:
मंगरुळपीर तालुक्यातील सर्व गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालयाची कामे पुर्ण करुन संबंधित लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे निर्देश गट विकास अधिकारी अरुण मोहोड यांनी दिले. ग्राम पंचायतीमधील मंजुर असलेली सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामेही पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तालुक्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस) करण्यासाठी ग्रामसेवकांनी आपल्या गावाची माहिती आॅनलाईन करण्याच्या सुचना मोहोड यांनी दिल्या.
विविध योजनेअंतर्गत करण्यात येणारी घरकुलाची कामे प्राधान्यक्रमाने पुर्ण करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी मोहोड यांनी सभेमध्ये दिले. याकामी दिरंगाई करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला.
आभार प्रदर्शन ग्रामसेवक विलास गव्हाणे यांनी केले.
सभेला पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवक, आरएचई आणि ग्राम पंचायत आॅपरेटर यांची उपस्थिती होती.
0 Response to "घरकुल, स्वच्छ भारत योजनेची कामे तातडीने करा: अरुण मोहोड"
Post a Comment