-->

पालकांची लूट थांबवा : ‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी

पालकांची लूट थांबवा : ‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यातील बोगस शाळांच्या गोरखधंद्याला आशीर्वाद कुणाचे? 


‘आप’चा शिक्षण विभागाला सवाल : बोगास शाळांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी 


पालकांची लूट थांबवा : ‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी 


वाशिम  -  जिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे पीक आले आहे. ही बाब हेरून काही ठगबाजांनी शिक्षण विभागाची कुठलाही परवानगी न घेता बोगस शाळा सुरू करून पालकांची आर्थिक लुबाडणूक सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या बोगस शाळांच्या गोरखधंदा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा खडा सवाल ‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आला. तसेच या बोगस शाळांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करीत, पालकांची होणारी लूट थांबविण्याची मागणी राम पाटील डोरले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली बोगस इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा उघडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळल्या जात आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे आपण या प्रकाराकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, कुठल्याही माध्यमाची शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी, त्याबाबतची नोंदणी शिक्षण विभागाकडे असणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय बळाचा वापर करून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षण विभागाची कुठलीच परवानगी न घेताच करताच पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अशा शाळांवर वेळीच कारवाई करणे गरजेचे असल्याची बाब निवेदनात नमूद केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी तथा राज्याचे शिक्षण मंत्री यांना दिल्या आहेत. 


शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणावर स्पष्ट शब्दांत आसूड

शिक्षण विभागाकडून नुकतीच रिसोड येथे एका बोगस शाळेवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बघता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बोगस शाळा उघडकीस येऊ शकतात. हे केवळ शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे, शिक्षण विभागातील अधिकारी -कर्मचारी यांना हाताशी धरूनच होऊ शकते, त्यामुळे अशा बोगस शाळांवर वेळीच कारवाई करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट शब्दांत शिक्षण विभागाच्या धोरणावर आसूड ओढला आहे. 


विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका!

या बोगस शाळांच्या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट होत आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे देखील अमुल्य असे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. याचा मानसिक ताण पालकांना सोसावा लागतो, याला जबाबदार कोण? अशा प्रकारचा प्रश्न देखील आता पालकांमधून विचारल्या जात आहे. त्यामुळे संबंधितांनी पैसा कमविण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळू नये, असा  स्पष्ट इशारा ‘आप’च्यावतीने देण्यात आला आहे. 


बोगस शाळांच्या पिकाला शिक्षण विभाग जबाबदार – राम पाटील डोरले

जिल्ह्यात शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेताच शाळा सुरू करण्याचे जे पीक आले आहे. त्याला सर्वस्वी शिक्षण विभागच जबाबदार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा बोगश शाळांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम आदमी पार्टीच्यावतीने दि. 21 ऑगस्ट 2023 पासून बेमुदत आंदोलनाचा ईशारा दिला आहे. अन्यथा शिक्षण मंत्र्यांसमोर जिल्ह्यातील बोगस शाळांचा पाढाच वाचावा लागेल, असे प्रतिपादन ‘आप’चे राम पाटील डोरले यांनी व्यक्त केले. 


Related Posts

0 Response to "पालकांची लूट थांबवा : ‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article