
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तथा लोकमान्य टिळक यांना अभिवादन
साप्ताहिक सागर आदित्य
शंकरराव गवळी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तथा लोकमान्य टिळक यांना अभिवादन
अमानी:- येथील स्व. शंकरराव गणुजी गवळी विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तथा स्वातंत्र सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण व स्वयंसेवी संस्था, अमानी चे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक ए.सी. गवळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बी.ई.गवळी हे होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर वर्ग आठवी ची विद्यार्थिनी कु. तनिषा खंडारे हीने लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर आपल्या भाषणांमधून प्रभाव टाकला.यानंतर वर्ग प्रतिनिधी तथा शालेय प्रतिनिधीच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख अतिथी बी.ई.गवळी यांनी दोन्हीही महामानवाच्या जीवन चरित्रातील विविध घटनांचा घटनाक्रम विद्यार्थ्यांसमोर विशद केला. यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये ए.सी. गवळी सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवसाच्या शाळेत शाळा शिकून कसे महान साहित्यरत्न बनलेत याच्या बद्दल विविध घटना सांगून आपण विविध पुस्तकांचं वाचन करावं,असे मार्गदर्शन केले. तसेच लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ करून त्यावेळी केलेली ही कृती स्वातंत्र्य मिळवून देण्यास कशी फायदेशीर ठरली.याची माहिती विद्यार्थ्यांना विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी. भिंगे तर आभार प्रदर्शन पी.एस. सरनाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद भाऊ गवळी व संदीप भाऊ ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यालयातील वर्ग आठवी ते दहावीचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तथा लोकमान्य टिळक यांना अभिवादन "
Post a Comment