
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
साप्ताहिक सागर आदित्य
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा वाशीम व जिल्हा व्यापारी मंच जिल्हा वाशीम यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद येथील महात्मा ज्योतीबा फुले सभागृह मध्ये बायर सेलर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली असून सदर कार्यशाळेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेला संपूर्ण जिल्ह्यातील उत्कृष्ठ उत्पादन करत असलेल्या बचत गटांनी आपल्या बनवलेल्या उत्पादनसह उपस्थिती दर्शवलेली होती.
बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू/पदार्थना बाजारपेठेत उत्कृष्ठ रित्या मागणी मिळण्याकरिता व्यापारी संघ सदैव प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी मंचाचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर राठी यांनी प्रतिपादन केले आहे तर CPDA चे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सारडा यांनी उपस्थित बचत गटाच्या उत्पादनाची विक्री करण्यास्तव विविध दाल,पेढा,राजगुरा लड्डू,हळद व मिरची उत्पदान करणाऱ्या गटाला विक्री पुरवठा करणेबाबत कळविले आहे.
बायर सेलर कार्यशाळेमुळे बचत गटाच्या उत्पादित वस्तूना उत्कृष्ठ भाव मिळून बाजारपेठेची उत्तम संधी उपलब्ध करून देण्याबाबत उपस्थित सर्व व्यापारी मंचाने आश्वासन दिले व सर्व बचत गटाची उत्पदान निहाय माहिती मागविली आहे त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन करण्यार्या गटातील महिलांनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच व्यापारी संघ मार्फत मागणी प्रमाणे बचत गटांना संपर्क करता येईल.
सदर कार्यशाळेला व्यापारी संघ शहर अध्यक्ष मधुर सचदेव,उपाध्यक्ष रुपेश मंत्री,चंद्रशेखर राठी,वैभव उलेमाले उपस्थित होते कार्यशाळेचे प्रास्ताविक उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप ढाले यांनी केले सदर कार्यशाळेला जिल्ह्यातील उत्कृष्ठ उत्पादन करणाऱ्या बचतगट प्रतिनिधी सह तालुका व जिल्हा स्तरीय सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .....
0 Response to "उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान "
Post a Comment