-->

सीईओ वैभव वाघमारे यांची कौतुकाची थाप…  उत्कृष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोटो लावुन केले अभिनंदन

सीईओ वैभव वाघमारे यांची कौतुकाची थाप… उत्कृष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोटो लावुन केले अभिनंदन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सीईओ वैभव वाघमारे यांची कौतुकाची थाप…

उत्कृष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोटो लावुन केले अभिनंदन


वाशिम 

जिल्हा परिषदेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा पायंडा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पाडला आहे. फेब्रुवारी आणि मार्च नंतर आता एप्रिल महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी  फोटोसह त्यांच्या कार्याची माहिती देणारे फलक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत लावण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यात कुपोषण कमी करण्यासाठी अप्रतिम काम करणाऱ्या मालेगाव तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या संपूर्ण टिमचे सुरुवातीलाच  या फलकामध्ये अभिनंदन करण्यात आले आहे. या तालुक्याचे पालक अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि गट विकास अधिकारी बाळकृष्ण अवगण यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी मदन नायक, सीडीपीओ सारिका देशमुख तसेच पर्यवेक्षिका मिनाक्षी सुळे, सविता दराडे आणि नंदा झळके यांनी कुपोषण कमी करण्यासाठी उत्कृष्ट काम केले होते. या टिमला टॉप वन चा दर्जा देऊन त्यांना गौरविण्यात आले. 

क्रमांक दोन वर विठोली (ता. मानोरा) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन लोंढे यांना गौरविण्यात आले आहे. लोंढे गुरुजींनी आपल्या शाळेच्या परिसरात हजारावर झाडे लावुन ग्रीन स्कुलची संकल्पना साकार केली. शाळेमध्ये सौर उर्जेचा वापर तसेच कचरा व्यवस्थापनही केले. मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करुन मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियानात तालुक्यातुन प्रथम कमांक पटकावला होता. त्यांच्या कामाची दखल सीईओ वाघमारे यांनी घेतली आहे.

आरोग्य विभागातील जिल्हा लेखा व्यवस्थापक कैलास गायकवाड यांनी बोलक्या शाळा करण्याकरीता नाविन्यपूर्ण  व कल्पकतेने अध्ययन निश्पत्तींचे सुलभीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

कोकलगाव आणि वारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बल्लाळ, काटा  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय काळे आणि चीफ मिनिस्टर फेलो विनिता उगावकर यांनी जिल्ह्यातील सर्व आशा व अंगणवाडी सेविकांना स्तनपान प्रशिक्षणाच्या तीन फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या या कामाची सीईओ वैभव वाघमारे यांनी दखल  घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. बल्लाळ यांनी त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 423 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया  केल्या याचीही विशेष दखल घेण्यात आली आहे. उकळीपेन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल ढोबळे आणि डॉ. अमोल खंडागळे यांनी एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांवर उपचार केल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले.

मालेगाव तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) सारिका देशमुख यांच्या कुपोषणमुक्तीच्या कामातील विशेष योगदानाबद्दल सीईओ वाघमारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.  शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाकाळ यांनी एप्रिल महिन्यात 2336 बाह्यरुग्णांवर उपचार केल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने गौरविण्यात आले आहे. मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम् सपकाळे आणि जी.एन.एम. शिल्पा तायडे यांनीही सर्वाधिक रुग्णांवर उपचार केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले आहे. महिला व बाल कल्याण विभागात विस्तार अधिकारी पदाचा पदभार सांभाळुन वाशिम सीडीपीओ पदाचाही पदभार उत्तम रितीने हाताळत असल्याबद्दल मदन नायक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन घरोघरी जाऊन जनजागृती करणाऱ्या आशा आणि एम.एस.आर.एल.एम. च्या सहयोगिनींचे सीईओ वाघमारे यांनी अभिनंदन केले.

नाविन्यपूर्ण पध्दतीने  कार्यालयासमोर झाडाच्या कुंड्या लावुन जि. प. चे सुशोभिकरण केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे हे सीईओ वाघमारे यांचे उत्कृष्ट अधिकारी ठरले आहेत, त्यांचे अभिनंद सीईओ वाघमारे यांनी केले आहे.

 -------------------------------------------------------

*चांगल्या कामाचे कौतुक मात्र चुकीला माफी नाही.*

जिल्हा परिषद अंतर्गत  लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाचा आग्रह धरणारे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामीण भागातील जनतेवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. दर महिन्याच्या शेवटी कामाचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे   फोटोसह माहिती फलक लावण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. त्यामुळे चांगल्या कामाची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात येते ही भावना प्रमाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चितच सुखावणारी आहे.

दुसरीकडे कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तसेच कामात हलगर्जीपणा  करणाऱ्या ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे एकीकडे चांगले काम करणाऱ्यांवर कौतुकांची थाप तर कामात कुचराई व दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका सीईओ वैभव वाघमारे यांनी घेतली आहे.

-------------------------------------------------------

0 Response to "सीईओ वैभव वाघमारे यांची कौतुकाची थाप… उत्कृष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोटो लावुन केले अभिनंदन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article