-->

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी   31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा   अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधा



साप्ताहिक सागर आदित्य 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी

 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा

 अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधा

टोल फ्री क्रमांक 18004195004

      वाशिम, दि. 15 (जिमाका) : सन २०२२-२३ या वर्षात जिल्हयात खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास 1 जुलै 2022 रोजी शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेची कप ॲन्ड कॅप मॉडेलनुसार अंमलबजावणी करण्याकरीता भारतीय कृषि विमा कंपनी, मुंबई यांनी जिल्हयात पीक विमा राबविण्यास मान्यता दिली आहे. ही योजना बिड पॅटर्ननुसार राबविण्यात येणार आहे. उभ्या पिकास दुष्काळ, पुर, भुस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, किड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग व वीज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या पीक नुकसानीस संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उददेश आहे. जिल्हयात खरीप हंगामात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन, कापुस, तुर, मुंग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही योजना जिल्हयातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना लागू करण्यात आली आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांसाठी 31 जुलै 2022 आहे.

         प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 15 जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी, केंद्र संचालक व भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सभा घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी तालुकानिहाय आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. पीक विमा भरतांना केंद्र संचालक व शेतकरी यामध्ये ई-पीक पाहणी केल्याशिवाय विमा भरता येत नाही अशा प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असल्याचे केंद्र संचालक यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. विमा प्रस्ताव भरत असतांना ई-पीक पाहणीबाबतच्या अहवालाची आवश्यकता नाही. असे कळविण्यात आले की, पीक विमा भरणा करीत असतांना 7-12 साधा किंवा डिजीटल 7/12 प्रस्तावासोबत लावण्याची आवश्यकता नाही. पीक पेरा याबाबत स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक व आधारकार्ड देऊन विमा योजनेमध्ये सहभागी होता येते.

          जिल्हयात सन 2021-22 या वर्षात 2 लक्ष 42 हजार 800 शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे 1 लक्ष 87 हजार 759 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणासाठी निश्चित करण्यात आले. 16 कोटी 69 लक्ष विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला. या योजनेअंतर्गत 799 कोटी 16 लक्ष रुपये विमा संरक्षित रक्कम होती. सन 2022-23 या वर्षात केवळ 10 हजार 287 शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहे. 8 हजार 215 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. 88 लक्ष रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला आहे. विमा संरक्षित रक्कम 42 कोटी 83 लक्ष रुपये आहे. गेल्यावर्षी 2 लक्ष 42 हजार 804 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्या तुलनेत यावर्षी केवळ 10 हजार 287 शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै 2022 आहे. आजपर्यंत 15 दिवसांचा कालावधी संपला असून केवळ 10 हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचा विमा योजनेत सहभागी होण्याचा प्रतिसाद हा अल्प असल्याचे दिसून येत आहे. उर्वरित 10 दिवसांमध्ये जवळपास 2 लक्ष 50 हजार शेतकरी सहभागी होणे अपेक्षित आहे. शेवटचे पाच दिवस शेतकरी बँक व आपले सरकार सेवा केंद्र यावर गर्दी करतात. त्या काळामध्ये पोर्टलवर देशभरातून ताण येत असल्यामुळे शेवटी विमा प्रस्ताव पोर्टलवर अपलोड होत नसल्याने अडचणी येतात. पर्यायी शेतकऱ्यांची विमा योजनेत सहभागी होण्याची इच्छा असून सुध्दा सहभागी होता येत नाही.

         यावर्षी जिल्हयासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी जिल्हयात कार्यरत आहे. त्यांचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. सोमेश देशमुख (8976906807) जिल्हा प्रतिनिधी- वाशिम तालुका, प्रेमसागर विभुते (8976906803) तालुका प्रतिनिधी- वाशिम, गोपाल नवघरे (9881812113) तालुका प्रतिनिधी- मंगरुळपीर, श्रीकृष्ण ढाकणे (8698491195) तालुका प्रतिनिधी- रिसोड, नितेश वाघ (9118231791) तालुका प्रतिनिधी- मालेगांव, देविदास शिंदे (9146927137) तालुका प्रतिनिधी-मानोरा आणि भुषण शिकारे (9766969394) तालुका प्रतिनिधी- कारंजा. भारतीय कृषी विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18004195004 असा आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन विमा प्रस्ताव नजिकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे दाखल करावा. अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, बँका, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.   


                                                                                                                                        

Related Posts

0 Response to "प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article