-->

सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन  मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


साप्ताहिक सागर आदित्य/

  सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन  मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

विद्यार्थी विकास विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांचा उपक्रम

वाशिम : दि.2 जाने -  

31डिसेंबर व 1 जानेवारी या दोन दिवस स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येते आपत्ती  व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा   संपन्न झाली. या  कार्यशाळेला   तज्ञ मार्गदर्शक म्हणून मनोज कनोजिया (  आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक पुणे ), अनिल वाघ  (आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक , पुणे )अशांत कोकाटे आपत्ती व्यवस्थापन  प्रशिक्षक   यांनी दोन  दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.


या कार्यशाळेचे  आयोजन   महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी सहा. प्रा. पंढरी गोरे, राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रम अधिकारी  डॉ . भारती देशमुख,   महाविद्यालयीन कार्यशाळा समिती प्रमुख सहा. प्रा. विजय वानखेडे यांनी केले.


दिनांक 31 डिसेंबर  रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रशिक्षण  कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजाणार झाली. विद्यापीठ गीत व सामूहिक प्रार्थना घेतल्यानंतर कार्यशाळेला सुरुवात झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर वाहणे, तसेच  उदघाटक  प्रा. डॉ. संजय साळीवकर, प्रा. डॉ. जयश्री देशमुख, प्रा. संजय साळवे, प्रा. वसंत राठोड.  आदी मान्यवर होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कार्यशाळा  समन्वय   सहा. प्रा. पंढरी गोरे  यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजन करण्याची आवश्यकता व समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपत्ती त्याचे प्रकार व त्याचे निवारण करण्याविषयक कौशल्य याची आवश्यकता  आहे असे सांगितले. आपण सर्व  आपत्तीला  सामोरे जात असतो तेव्हा  प्रथमोपचार मिळने आवश्यक असतो तो प्रथमोपचार योग्य  माहिती असल्याशिवाय देता येणार नाही म्हणून समाजकार्यकर्त्यांना   प्रशिक्षण  देऊन क्षमता विकास करणे  नेहमी आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठी प्रशिक्षित समाजकार्यकर्ते निर्माण करणे  हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे प्रस्ताविकातून स्पष्ट केले.कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. संजय साळीवकर  यांनी      

समाजकार्य  शिक्षण व   प्रशिक्षण  याची व्यावसायिक समाजकार्यकर्ता म्हणून असलेली भूमिका  विषध केली. आपत्ती दरम्यान  मदत पोहचविण्यासाठी अशाप्रकारच्या प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी विषद केले.

यानंतर  आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अशांत कोकाटे   यांनी  विद्यार्थ्यांना  आपत्ती  संकल्पना  व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  आपत्ती व्यवस्थापनामध्ये  तीन टप्पे असतात आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान, आपत्तीनंतर याविषयी विद्यार्थ्यांना  घावायची काळ्जी व संरक्षणात्मक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन  व प्रशिक्षण दिले.   प्रथमोपचार पद्धतीमध्ये CPR  याविषयी  विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण दिले.  

यानंतर  आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अनिल वाघ   यांनी विद्यार्थ्यांना    आपत्तीदरम्यान घ्यावायची काळ्जी   विविध दोरखंडाचे प्रकार व आपत्तीमध्ये त्याची उपयुक्तात याविषयी प्रशिक्षण दिले.

दिनांक 1 जानेवारी रोजी  नियोजित कार्यक्रमात प्रास्ताविक यांच्या  राष्ट्रीय सेवा  योजना  यामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य वाढीसाठी अशाप्रकारचे  उपक्रम महत्वाचे असतात. विद्यार्थ्यांना आपल्या  सुप्त कौशल्याचा विकास  करण्याचे हे प्रशिक्षण  माध्यम आहे  असे त्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन यशदा  प्रशिक्षक  मनोज कानोजिया  यांनी  आपल्या मार्गदर्शक  सत्रामध्ये   आगीचे  प्रकार , आग लागण्याची प्राथमिक  कारणे, ती विझविण्यासाठी करावयाची प्राथमिक तयारी व दक्षता याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.  आपत्तीदरम्यान निर्णय घेताना  सुरक्षितितेच्या सर्व बाजूचा विचार करावा असे त्यांनी सांगितले.  तसेच विविध  प्रात्यक्षिक याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहणे यांनी अशाप्रकारचे उपक्रम विद्यार्थी यांना  क्षमता बांधणीसाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  प्रा. डॉ. संजय साळीवकर, प्रा. डॉ. जयश्री  देशमुख, प्रा. डॉ. संजय साळवे, प्रा. गजानन बारड, सहा. प्रा. जयश्री काळे, सहा. प्रा. दिपाली देशमुख, प्रा. वसंत राठोड, प्रा. पंडित नरवाडे, प्रा. प्रसेनजीत चिखलीकर,  प्रा. गजानन हिवसे, प्रा. विजय वानखेडे, प्रा डॉ.भारती देशमुख, प्रा. मनीषा किर्तने,प्रा.मंगेश भुताडे, प्रा. रवींद्र पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यशाळा यशस्वी केली.  कार्यशाळेचे सूत्रसंचालन संजय नेहूल, गणेश मगर, मयुरी अवताडे यांनी केले.या सर्व उपक्रमासाठी महाविद्ययालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  स्नेहदीप सरनाईक  यांचे मार्गदर्शन लाभले.






0 Response to "सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article