-->

पांगरी नवघरे येथील युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला

पांगरी नवघरे येथील युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला



साप्ताहिक सागर आदित्य/

पांगरी नवघरे येथील युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला

मालेगाव :  पांगरी नवघरे येथील युवक केशव लक्ष्‍मण नवघरे हा  सायंकाळच्या वेळेस   थंडीच्या गारव्याचेप्रमाण असल्यामुळे  शेकोटीचा आश्रय घेत होता अशा परिस्थितीत चार-पाच युवकांच्या उपस्थितीमध्ये शेकोटी वर बसला असताना कुठलाच अंदाज नसताना गावातील दुसरा युवक ज्ञानेश्वर रामदास नवघरे हा अचानक मागे येवून जखमी च्या शरीरावर एकापाठोपाठ वार करत असल्याचे दिसून आल्यामुळे ही बाब पानपट्टी दुकान धारक निखिल विठल नवघरे यांच्या लक्षात आली या युवकाने कुठल्याही जीवाची पर्वा न करता थेट दोघांच्या मध्ये झटपट सुरू असताना  हस्तक्षेप करून संबंधित  हल्लेखोरांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना निखील विठ्ल नवघरे यावरही हल्लेखोरांनी दोन चाकूचे हल्ले करून या दुकान धारकाला ही जखमी केले दोन चाकूचे वार करून त्यालाही जखमी अवस्थेत न ठेवता आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा केला असताना यांची तारांबळ पाहता हल्लेखोर यूवकाने तेथून पळ काढला असून संबंधित जखमी युवकाला गावकऱ्यांच्या साह्याने  प्रथमदर्शी मालेगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑटोनी आणून नंतर वाशिम ला पाठवण्यात आले.


वाशीमला जखमी ची परिस्थिती पाहता तेथून  त्याला अकोल्याला पाठविण्यात आले असून अकोल्याच्या ओझोन हॉस्पिटलमध्ये  जखमी अवस्थेत असलेल्या केशव लक्ष्मण नवघरे यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी निखील नवघरे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून मालेगाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर नवघरे याच्याविरुद्ध कलम 307, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास ठाणेदार  धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलिस करत आहेत.








0 Response to "पांगरी नवघरे येथील युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article