-->

वाशिम येथे सोमवारी भव्य निःशुल्क मधुमेह तपासणी शिबिर

वाशिम येथे सोमवारी भव्य निःशुल्क मधुमेह तपासणी शिबिर

 


साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम येथे सोमवारी भव्य निःशुल्क मधुमेह तपासणी शिबिर 

प्रतिनिधी /२ जानेवारी 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजन 

सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट चा सेवाभावी उपक्रम 

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन 


वाशिम: वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या वाशिम येथील सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ वी जयंतीनिमित्त सोमवार ,३ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये भव्य एकदिवसीय निःशुल्क मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन डॉ.कानडे बाळ रुग्णालय जवळ सेवार्थ पथोलॉजी लॅब मध्ये करण्यात आले आहे. ट्रस्ट च्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.सेवार्थ  ट्रस्ट  च्या    वतीने विधवा महिला,आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब , माजी सैनिक,दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष सवलतीत निदानात्मक सेवा दिल्या जातात.

मधुमेह रुग्णांची नियमित शुगर तपासणी न झाल्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हा  आजार  विविध रोगांना आमंत्रण देणारा आहे जसे की किडनी,हृदयरोग,डोळे निकामी होणे,लकवा होणे त्यात कोरोणा सारखा  आजार उद्भवल्या मुळे लाखो लोक मृत्यूच्या विळख्यात गेले होते. कोरोना महामारीत जास्तीत जास्त शुगरच्या रुग्णांना विविध संकटांचा सामना करावा लागला त्यामुळे विविध उपचार करून सुद्धा त्यांना लवकर बरे होता आले नाही. योग्य आहार व योग्य औषधोपार घेतल्याने या आजारातून सुटका होण्यास मदत होते त्यामुळे वेळीच मधुमेह आजाराचे निदान होणे गरजेचे आहे  त्यामुळे लवकरात लवकर शुगर चे निदान करून येणाऱ्या  काळामध्ये आरोग्य चांगले राहावे या दृष्टिकोनातून कोरोना महामारीचे सर्व नियम व अटी पाळून या मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सागर के जाधव यांनी केले आहे.






Related Posts

0 Response to "वाशिम येथे सोमवारी भव्य निःशुल्क मधुमेह तपासणी शिबिर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article