-->

समृद्ध व्यक्तिमत्वासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे                          निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

समृद्ध व्यक्तिमत्वासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

समृद्ध व्यक्तिमत्वासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे

                        निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे


       वाशिम,  :  माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षपूर्तिनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.


          निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे हे उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रत्येकाने ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. मनःस्वाथ्यासाठी वाचन हे आवश्यक आहे. समृध्द जीवन जगण्यासाठी आणि आदर्श व्यक्तीत्व विकासासाठी वाचनाचे महत्व त्यांनी विषद केले.   


          घुगे पुढे म्हणाले,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात समृद्ध ग्रंथ संग्रह उपलब्ध असून यासाठी फक्त 100 रुपये द्विवार्षिक वर्गणी आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांने ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


          कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते स्व.ए.पी.जे. अब्दुल कलाम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी वाशीम येथील शासकीय ग्रंथालय समृद्ध असून दर रोज जवळपास 150 ते 160 विद्यार्थी रोज स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेचा लाभ घेतात. जिल्ह्यातील वाचन संस्कृती वाढली पाहिजे,यासाठी प्रत्येक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय ग्रंथालयाचे सभासद व्हावे असे ते म्हणाले.


          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक प्रभाकर घुगे होते.यावेळी समाधान अवचार,विलास कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नवल कव्हळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील जी.बी.बेंद्रे यांनी परिश्रम घेतले.



0 Response to "समृद्ध व्यक्तिमत्वासाठी ग्रंथ वाचन महत्वाचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article