-->

वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार  21 कोटी रु निधी मंजूर

वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार 21 कोटी रु निधी मंजूर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार

21 कोटी रु निधी मंजूर

       वाशिम,  : जिल्हयात जिल्हा परिषदेच्या 775 शाळा आहेत. सन 2022-23 च्या यु-डायसनूसार जिल्हयातील 230 वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता आहे. 195 शाळांना जिल्हा वार्षिक  योजनेतून सन 2022-23 या वर्षात 18 कोटी रुपये निधी मंजूर आहे. समग्र शिक्षा अभियानातून 28 शाळांच्या दुरुस्तीकरीता 79 लक्ष 23 हजार रुपये निधी आणि आदर्श शाळा बांधकाम योजनेजून 7 शाळांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 78 लक्ष 25 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. अशा एकूण 21 कोटी 35 लक्ष रुपये निधीतून लवकरच वर्गखोल्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.

            ज्या वर्गखोल्या नादुरुस्त आहेत, त्या वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना बसविण्यात येत नाही. वर्गखोल्यांची दुरुस्तीची कामे झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना या वर्गखोल्यात बसविण्यात येईल. वर्गखोल्या दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पुर्ण केली जातील. अशी माहिती जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.



Related Posts

0 Response to "वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार 21 कोटी रु निधी मंजूर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article