-->

नवोदय विद्यालयाचा  सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

नवोदय विद्यालयाचा सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

 


साप्ताहिक सागर आदित्य 

नवोदय विद्यालयाचा

सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

       वाशिम,  : जवाहर नवोदय विद्यालयांतर्गत शैक्षणिक वर्ष 2023 च्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षेमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने याहीवर्षी कायम ठेवली आहे. यामध्ये इयत्ता 10 वीचे 81 पैकी 81 आणि इयत्ता 12 वीचे 43 पैकी 43 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमधून 43 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक गौरी ढवळे 92.83 टक्के, व्दितीय क्रमांक आरती खडसे 90.33 टक्के व तृतीय क्रमांक कार्तीक जोगदंड व रोहित ओळंबे यांनी 88.33 टक्के गुण मिळविले आहे.


          इयत्ता 10 वीत प्रथम क्रमांक सुदर्शन देवकर 98.17 टक्के, व्दितीय क्रमांक तेजस्विनी सावळे 97.67 टक्के व तृतीय क्रमांक शुभव वनासकर व सुजल मगर यांनी 93.33 टक्के गुण मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य सचिन खरात व वरिष्ठ शिक्षक एस.जी. पवार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



Related Posts

0 Response to "नवोदय विद्यालयाचा सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article