-->

आयुष्मान भव मोहीम : आरोग्य मेळाव्याला उपसंचालक डॉ.चव्हाण व डॉ.डोईफोडे यांची भेट

आयुष्मान भव मोहीम : आरोग्य मेळाव्याला उपसंचालक डॉ.चव्हाण व डॉ.डोईफोडे यांची भेट

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आयुष्मान भव मोहीम : आरोग्य मेळाव्याला उपसंचालक डॉ.चव्हाण व डॉ.डोईफोडे यांची भेट 


वाशिम, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण आणि संचालक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी,राज्य टी.बी.प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक केंद्र,नागपुरचे डॉ. विजय डोईफोडे यांनी 30 सप्टेंबरला आरोग्य वर्धिनी केंद्र,शेलूबाजार,दापुरा आणि ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे आयुष्मान भव मोहीमेअंतर्गत आरोग्य मेळाव्याला भेट दिली.त्यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग व कुष्ठरोग आणि इतर संसर्गजन्य आजाराबाबत संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली.यावेळी त्यांनी सर्व आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला.   

               आयुष्मान भव : निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे 18+,आभा कार्ड,गोल्डन कार्ड, असंसर्गजन्य आजार,साथरोग व इतर सर्व आरोग्यविषयक बाबींचा आढावा घेतला.यावेळी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.परभणकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगत,बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड,वैद्यकीय अधिकारी डॉ.रुईकर,सर्व वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग विभागातील कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, आरोग्य विस्तार अधिकारी,तालुका आरोग्य सहायक,आरोग्य सहायक, सहायिका,आरोग्य सेवक व सेविका, आशा गट प्रवर्तक व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "आयुष्मान भव मोहीम : आरोग्य मेळाव्याला उपसंचालक डॉ.चव्हाण व डॉ.डोईफोडे यांची भेट"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article