-->

राजस्थान आर्य  महाविद्यालयात आपत्ती धोके निवारण दिवस साजरा

राजस्थान आर्य महाविद्यालयात आपत्ती धोके निवारण दिवस साजरा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राजस्थान आर्य  महाविद्यालयात आपत्ती धोके निवारण दिवस साजरा 


वाशिम, एन एस एस विभाग राजस्थान आर्य महाविद्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोंबर रोजी डागा सभागृह,राजस्थान महाविद्यालय वाशिम येथेआपत्ती धोके निवारण दिवस   आयोजित करण्यात आला होता.

           संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलेली आहे.

          राज्य शासनाने दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून दर वर्षी जिल्हा पातळीवर आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

      यानिमित्ताने राजस्थान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती धोके निवारण दिवसानिमित्त आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासंदर्भात प्रतिज्ञा दिली.


       यावेळी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना याबाबत विद्यार्थ्यां मध्ये जाणीव जागृती करून आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे ऍप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी  प्रत्यक्ष नोंदणी केली. 

 

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. हेमंत वंजारी, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, राजेश मस्के IQAC समन्वयक,एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलेश सोनोने, डॉ स्वप्नील काळबांडे, डॉ सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

         प्रास्ताविक डॉ. शैलेश सोनोने यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थी यांना आपत्ती धोके निवारण बाबत शपथ दिली. यावेळी डॉ. राजेश मस्के व डॉ. सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे संचालन कु. राधिका दंडे व आभार रोहन काष्टे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 Response to "राजस्थान आर्य महाविद्यालयात आपत्ती धोके निवारण दिवस साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article