
जिल्हा परिषद शाळेत घाटा येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद शाळेत घाटा येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा केंद्र शिरपूर पंचायत समिती मालेगाव येथे मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.नंतर मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर सर यांनी त्यांच्या विषयी माहिती व वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. वाचाल तर वाचाल! वाचाल तर टिकाल! जीवनात पुस्तके किती महत्त्वाचे आहेत . पुस्तक हेच गुरू,जेथे दिसेल पुस्तक, तेथे व्हावे नतमस्तक! तसेच ज्येष्ठ शिक्षक रतन पट्टेबहादुर सर यांनी आपले अनुभव विषद करून विस्तृत मार्गदर्शन केले .दिपाली कापसे मॅडम यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मुलांचे वाचन घेतले, ग्रंथालयातील पुस्तके देऊन मुलांना एक तास एकाग्रतेने वाचन करायला सांगितले. सर्वांनी शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके वाचनास दिली. विद्यार्थ्यांनी अगदी आनंदात वाचन केले...... कार्यक्रमाचे संचालन कालवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंचवाटकर सर यांनी केले.यावेळी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते
0 Response to "जिल्हा परिषद शाळेत घाटा येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा"
Post a Comment