-->

यवतमाळ अकोला जिल्ह्यातील वृद्ध साहित्यीक कलाकार समित्यांचे गठण झाले . वाशीम जिल्हा मात्र पिछाडीवरच ?

यवतमाळ अकोला जिल्ह्यातील वृद्ध साहित्यीक कलाकार समित्यांचे गठण झाले . वाशीम जिल्हा मात्र पिछाडीवरच ?

 


साप्ताहिक सागर आदित्य/

यवतमाळ अकोला जिल्ह्यातील वृद्ध साहित्यीक कलाकार समित्यांचे गठण झाले . वाशीम जिल्हा मात्र पिछाडीवरच ? 

वाशीम जिल्ह्यातील लोककलावंताना मानधन मंजूरीची प्रतिक्षा !‌

वाशीम : गेल्या विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सिहासनारूढ झाले . परंतु जवळ जवळ अडीच वर्ष लोटली तरीही नव्या सरकारने, विविध महामंडळ आणि शासकिय निमशासकिय समित्यांचे गठनच केले नसल्यामुळे जनतेची विकासाची सर्वच कामे ठप्प पडून प्रलंबित राहील्याचे वास्तव आहे . समित्यांचे गठण होत नसल्याने सर्वच राजकिय पक्षाचे कार्यकर्तेही पक्षश्रेष्ठींवर नाराज होते . प्रत्येक जिल्ह्यातील विविध समित्यांचे गठण करण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असते . तेव्हा शिवसेना - काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षांशी

बैठक घेऊन त्यांनी हा प्रश्न निकाली काढणे जरूरी झाले आहे . पश्चिम विदर्भातील एकमेव अशा " विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा " या संस्थेने वाशीम जिल्ह्यातील विविध समित्यांच्या गठना सोबतच " वृद्ध साहित्यीक समिती " च्या गठनाची मागणी गेल्या विधानसभा निवडणूकीच्या निकालापासून सातत्याने लावून धरलेली आहे . त्याकरीता त्यांनी कित्येकदा कलावंताचे धरणे आंदोलन सुद्धा केलेले आहे . शिवाय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा पत्रकार संजय मधुकरराव कडोळे यांनी, खासदार भावनाताई गवळी, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार अमित झनक, अपक्ष आमदार किरणराव सरनाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष - चंद्रकांत ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वेळोवेळी जिल्हा परिषद वाशीमची " वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती " स्थापन करण्याची मागणी केली . याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या सन 2020 पासून तिन वर्षा पासून वृद्ध कलाकार निवड समितीच अस्तित्वात नसल्याने, तिन वर्षापासून लोककलावंताचे हजारो प्रस्ताव निवडी अभावी,जि प समाज कल्याण कार्यालयात धुळ खात पडलेले आहेत . त्यामुळे लोककलावंताना मानधन मंजूर करून सुरु करण्यात आलेले नसल्याने, ऐन कोरोना महामारी काळात व वृद्धापकाळी लोककलावंताची परवड होत असल्याने त्यांच्यात, महाविकास आघाडी शासनाप्रती, नैराश्याची भावना आलेली आहे . तरी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी समिती गठण करणे जरूरीचे झाले आहे . नुकतेच मागील आठवड्यात यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील पालक मंत्र्याकडून त्या त्या जिल्हयात वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समित्यांचे गठण करण्यात आले आहे . मात्र वाशीम जिल्हा अद्यापही पिछाडीवर असल्यामुळे, त्याकडे वाशीम जिल्ह्यातील समित्यांच्या निवडीकडे, अगदी चातक पक्षाप्रमाणे इच्छुक दिव्यांग व वयोवृद्ध लोककलावंताचे लक्ष लागले आहे .

Related Posts

0 Response to "यवतमाळ अकोला जिल्ह्यातील वृद्ध साहित्यीक कलाकार समित्यांचे गठण झाले . वाशीम जिल्हा मात्र पिछाडीवरच ? "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article