-->

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर


•मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात


वाशिम, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.मतदार जागृतीसाठी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, तीनही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,कैलास देवरे, वैशाली देवकर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती.


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज मतदान जनजागृती पथनाट्य व उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये श्री.बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 


*पथनाट्य, घोषणामधून मतदार जागृतीचा संदेश* : 

माझं मत माझं भविष्य मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, छोडो अपने सारे काम पहिले करू मतदान, 

‘मतदान आपला अधिकार, नका घालवू वाया...’ ‘वोट डालने जाना है, अपना फर्ज निभाना है’ ‘बुढे हो या जवान, सभी करे मतदान’ ‘छोडो अपने सारे काम, चलो करे पहले मतदान’ अशा घोषण देत विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश दिला. यावेळी बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर करत मतदार जागृतीचा संदेश दिला.


मतदान करा, लोकशाही बळकट करा : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस 


मतदार जागृतीसाठी आयोजित या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचण्यास मदत होईल. येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, कोणतेही कारण न देता मतदान करावे. विशेषतः महिला व दिव्यांग मतदारांनी अवश्य मतदान करावे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, रँप, स्वयंसेवक, आवश्यकतेनुसार मोफत वाहतूक व्यवस्था आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तरी प्रत्येक मतदार बांधवांनी मतदान करावे, लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी यावेळी केले.

 यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी 

       " मतदारांसाठी प्रतिज्ञा '

'आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या

लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे

पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या

प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू." यांनी प्रतिज्ञा घेतली.


स्वाक्षरी फलकाचे अनावरण : 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एक उत्सव सोहळाच आहे मतदान जागरूकता अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासह उपस्थित अधिकारी यांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या केल्या.


 एनसीसीचे शिक्षक अमोल काळे , अंगणवाडीसेविका, बचत गटातील महिला,आशा कर्मचारी, विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात "मतदार राजा जागा हो ... लोकशाहीचा धागा हो" चा जागर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article