तेलकट, मसालेदार पदार्थांमुळे अॅसिडिटीचा त्रास वाढला; काय काळजी घ्याल?
साप्ताहिक सागर आदित्य
तेलकट, मसालेदार पदार्थांमुळे अॅसिडिटीचा त्रास वाढला; काय काळजी घ्याल?
डाॅ निलेश बढे
दिवाळीतील अयोग्य फराळ महागात पडतोय
वाशिम : दिवाळीदरम्यान तेलकट, मसालेदार पदार्थांचा वाढता वापर आणि जेवनाच्या अनियमित वेळा यामुळे अनेकांना आता अॅसिडीटीचा त्रास जाणवू लागला आहे. प्रत्येकाने आरोग्य जपावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना अॅसिडीटीचा त्रास जाणवतो. शरीरामधील पित्त या दोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारी व्याधी अनेकांना त्रस्त करून सोडते. छातीत जळजळणे, तोंडाला येणारे कडवट, आंबट असे पाणी, सतत होणारी मळमळ आणि तीव्र डोकेदुखी ही अॅसिडीटीची लक्षणे मानली जातात. दिवाळीदरम्यान तेलकट, मसालेदार पदार्थांचे जादा सेवन झाल्याने आणि जेवनाच्या वेळाही अनियमित झाल्याने अनेकांना आता अॅसिडीटीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अॅसिडीटीचा त्रास टाळण्यासाठी आवश्यक ती पथ्ये पाळावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
............
अॅसिडिटीची कारणे काय?
अतिशय तिखट व आंबट, मसालेदार, चमचमीत जेवण करणे, अतिप्रमाणात चहापान, अति मद्यपान व धुम्रपान, अतिजागरण, जेवणाच्या अनियमित वेळा, भूक लागलेली असताना आहार न घेणे आदींमुळे अॅसिडिटी होते, असे तज्ज्ञ सांगतात.
............
तळीत, मसालेदार पदार्थ टाळा!
अॅसिडिटी होऊ नये म्हणून तळलेले, अति तिखट, मसालेदार पदार्थ शक्यतोवर टाळायला हवे. पचायला जड असलेले तसेच जास्त प्रोटीन असलेले पदार्थ टाळावे. सायंकाळचे जेवन शक्यतोवर थोडे लवकर करावे आणि जेवनानंतर थोडे चालणे झाले तर अॅसिडिटीचा त्रास टाळता येईल.
...............
सकाळी लिंबू पाणी प्यावे का?
रोज सकाळी अर्धा ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते आणि पोटाच्या काही समस्यांपासून दूर राहता येते. लिंबूत हायड्रोक्लोरिक अॅसिड असल्याने पचनशक्ती सुधारते, अॅसिडिटी दूर होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
..................
कोट
हल्ली अनेकांना अॅसिडिटीची समस्या जाणवत आहे. ॲसिडिटीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. वारंवार पोट गच्च वाटणे, मळमळ, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. नीलेश बढे
पोटविकार तज्ज्ञ, वाशिम
0 Response to "तेलकट, मसालेदार पदार्थांमुळे अॅसिडिटीचा त्रास वाढला; काय काळजी घ्याल?"
Post a Comment