"श्रीं" च्या प्रकटदिनाचा असाही योगायोग; तिथी व तारीख आली जुळून
"श्रीं" च्या प्रकटदिनाचा असाही योगायोग; तिथी व तारीख आली जुळून
श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रगटदिन बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे.
शेगाव - श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रगटदिन बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे. या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे "श्रीं"च्या प्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे.अभ्यासकांच्या मते असा हा योगायोग काही वर्षांनंतर जुळून आला आहे. ज्या दिवशी श्री गजानन महाराज प्रकट झाले.तो दिवस शनिवार होता.यावेळी तिथी व तारीख एक असली तरी दिवस मात्र बुधवार आहे.माघ वद्य सप्तमी शके १८०० दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज प्रकट झाले.काही वर्षानंतर यावर्षी तिथी व तारीख एकच आली आहे. त्यामुळे या प्रकटदिनाला भक्तांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.कोविड-19 चा प्रादुर्भाव नसता तर विदर्भपंढरी संतनगरीसह महाराष्ट्रात व देश-विदेशात श्रींचा हा प्रगट दिन निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर साजरा झाला असता.परंतु कोविडचे नियम पाळत श्रींच्या भक्तांकडून प्रकटदिनाची तयारी ठिकठिकाणी सुरू झाली आहे.
"श्रीं"च्या प्रकट होण्याचा प्रसंग
या पृथ्वीतलावर परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी अनेक असे अवतार घेवून भक्तांचा उद्धार केला. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज यांनी प्रत्यक्ष जगाच्या उद्धारासाठी प्रकट होवून अवतार कार्य केले.ते शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्ह वेळी ऐन तारूण्याअवस्थेत एकदम प्रगट झाले.त्यावेळी ते तीस बत्तीस वर्षाचे असावे असा अंदाज आहे.उष्ट्या पत्रावळीतील भातशेते निजलीलेने वेचून खात असताना बंकटलाल व दामोदर पंत यांना श्री गजानन महाराज दिसले.तो दिवस होता माघ वद्य सप्तमी.हाच दिवस "श्रीं" चा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.या वर्षी "श्रीं" चा १४४ वा प्रकट दिन आहे.
0 Response to ""श्रीं" च्या प्रकटदिनाचा असाही योगायोग; तिथी व तारीख आली जुळून"
Post a Comment