साप्ताहिक सागर आदित्य/छत्रपती शिवराय व आजचा तरुण
आजची तरुण पिढी आधुनिक दिसण्यासाठी पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करताना दिसून येते, आणि त्यात काही गैरही नाही,पण आपली भारतीय संस्कृती विसरून चालणार नाही,आजचा तरुण गळ्यात माळा घालून कपाळावर चंद्रकोर लावतो, भगवे कपडे घालतो,हातात भगवे दोरी बांधून कानात बाळी घालतो, महाराजा सारखी दाढी करतो, गाडीवर जय शिवराय असे लिहिलेले असते,ती चंद्रकोर काढलेला असतो आजची पिढी तोंडात गुटख्याच्या तोबरा खालून सगळीकडे पिचकारी मारत फिरतो, या महाराजांनी किल्ले बांधले त्यांनी कधी स्वतःचे नाव किल्ल्यावर दिले नाही, आजचा तरुण त्या गड किल्ल्यावर जाऊन भिंतीवर नावे लिहून टाकतो, दारू पार्ट्या करून बाटल्या तिथेच फोडतो,कचरा करतो आणी तरीही महाराजासारखा दिसण्याचा प्रयत्न करतो,वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी आणि मावळ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली,अपुरे संख्याबळ, अपुरीच शस्त्रसामग्री, अपुरा पैसा असताना बलाढ्य असणाऱ्या मुघलांचा मुकाबला केला, आणि ती स्वराज्य पूर्ती करून दाखवली, आणि तेथे आजचा तरुण काय करतोय?
आज असे अनेक तरुण आहेत जे फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप आणि गावागावात पडून आहेत,जे स्वतःला शिवभक्त शिवकन्या म्हणून घेतात, पण आजचे किती तरुण आहेत जे खरोखर महाराजांचे विचाराचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात? प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानतात?ही तरुण पिढी शिवजयंतीनिमित्त डीजे आणि बँड लावून दारू पिऊन धिंगाणा घालतात, रात्रभर बंडलबाजी सुरू असते, दारूच्या नशेत हे लोक महाराजांच्या घोषणा देत असतात, सगळे वाईट धंदे करुन शेवटी सगळे महाराजांच्या नावावर खपवले जातात ते बघून मन खंतावते,
मित्रांनो आजचा तरुण व्यसनाधीन होत चालला आहे,झटपट पैसा मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करत आहेत, सध्या तरुणांमध्ये राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान दिसत नाही,माझ्या राजाच्या स्वराज्यात अठरापगड जातीचे लोक राहत होते, सर्व धर्म समान हा नियम सर्वांना लागू होता,पण आजचा तरुण जाती धर्मासाठी एकमेकांची डोकी फोडत आहे, आजचा तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याची व चालवण्याची क्षमता आहे,पण इच्छाशक्तीचा अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत, शिवरायांची भवानी तलवार त्यातून मिळणारी प्रेरणा व त्याचे फक्त तुरुंगातच समस्त जगाला अधिकार मिळवून देऊ शकते, तरुणांना आपल्यातील सुप्त सामर्थ्य जगण्याची गरज आहे आणि योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी पालकांची आहे,आता या स्वराज्याची कमान आपल्या म्हणजे तरुणांच्या हाती आहे, आपण या स्वराज्याला सुराज्या कडे कसे नेता येईल, हे बघितले पाहिजे, आपण आपले नाव मोठे करा, आपल्या नावाबरोबर आपल्या महाराष्ट्राचे व तसेच आपल्या शिवरायांचे नाव अधिक अधिक उंचावर नेता येईल आपण आपल्या विचारांचे शिवराय बाळगावेत, जर एखाद्या माय बहिणीला संकटातून वाचवावे,शिवजयंतीला डीजे मोठे आवाज न करता आपण शिवजयंतीला निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ठेवाव्या ही खऱ्या अर्थाने शिवजयंती म्हणता येईल.
0 Response to "छत्रपती शिवराय व आजचा तरुण"
Post a Comment