-->

जिल्ह्यातील मानधन लाभार्थी कलावंतानी, आपली वैयक्तिक माहिती सांस्कृतिक विभागाला कळवावी - संजय कडोळे

जिल्ह्यातील मानधन लाभार्थी कलावंतानी, आपली वैयक्तिक माहिती सांस्कृतिक विभागाला कळवावी - संजय कडोळे


साप्ताहिक सागर आदित्य/

जिल्ह्यातील मानधन लाभार्थी कलावंतानी, आपली वैयक्तिक माहिती सांस्कृतिक विभागाला कळवावी - संजय कडोळे              वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून सन१९५४-५५ पासून, लोककलेत हयात घालविण्याऱ्या, उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसणाऱ्या लोककलाकाराकरीता "वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना " समाजकल्याण जिल्हा परिषदेद्वारा राबविण्यात येत असून, वर्तमानस्थितीत अंदाजे तिस हजार लाभार्थी कलावंत याचा लाभ घेत आहेत .                 .                   या योजनेचे वैशिष्ट्य असे की, वयोवृद्ध लोककलावंताला या योजनेचे मानधन दरमहा मिळत असून लाभार्थ्याचे मृत्युनंतर त्याच्या वारसदार पती किंवा पत्निला सुद्धा हा लाभ मिळत असतो . परंतु बऱ्याच वेळा अशा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीची विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तर्फे आम्ही, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई व सांस्कृतिक कार्य संचनालय मुंबई येथे शहानिशा केली असता सांस्कृतिक कार्य संचनालयाकडून असे कळले की, बऱ्याच लोककलाकारांची अतिरिक्त माहिती त्यांचेकडे उपलब्ध नाही . जसे की,१ ) आधारकार्ड २) पॅन कार्ड ३)  संपूर्ण पत्ता ४ ) मोबाईल नंबर . त्यामुळे अखेर सांस्कृतिक कार्य संचनालयाने प्रत्येक जिल्ह्यातील, सध्या मानधन घेत असलेल्या लाभार्थी कलाकारांची माहिती अद्यावत करण्याचे ठरवीले आहे . त्यामुळे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून, मानधन घेत असलेल्या सर्वच लाभार्थी साहित्यीक लोककलाकारांना सुचित करण्यात येत आहे की, त्यांनी विहित नमुन्यात आपली संपूर्ण माहिती, १ ) आपला पासपोर्ट फोटो, २ ) लाभार्थी कलाकाराचे नाव . ३) स्वतः लाभार्थी आहे किंवा कलाकाराचा वारसदार आहे . ४) आपला संपूर्ण पत्ता ५ ) लाभार्थी म्हणून निवड कोणत्या वर्षी झाली . ते वर्ष ६ ) कलेचा प्रकार ७ )आधारकार्ड ८) पॅनकार्ड ९) बॅकेचे नाव व शाखा १० ) आय एफ एस सी क्रमांक ११ ) पॅन कार्ड इ . आपली संपूर्ण माहिती, व्हॉट्सअप क्रमांक : ८४२४९२०६७६ वर दि .३१ जानेवारी २०२२ पर्यंत शासनाकडे पाठवावी . आणि माहितीची प्रत १) गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि २) जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वाशीम यांना प्रत्यक्ष कागदपत्रासह सादर करण्याचे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, शहर अध्यक्ष उमेश अनासाने, वाशीम येथील हभप श्रीकृष्ण महाराज राऊत मंगरूळपिर येथील ज्येष्ठ लोककलावंत हभप राजाराम पाटील राऊत, मानोरा येथील लोमेश पाटील चौधरी, शाहिर संतोष खडसे, रिसोड / मालेगाव येथील ज्येष्ठ बंजारा लोक कलावंत वसंत महाराज राठोड व वृध्द साहित्यीक लोक कलाकार समिती कडून करण्यात आले आहे.





0 Response to "जिल्ह्यातील मानधन लाभार्थी कलावंतानी, आपली वैयक्तिक माहिती सांस्कृतिक विभागाला कळवावी - संजय कडोळे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article