स्मशानातील मसानजोगी यांना मासिक मानधन सुरू करावे - वैदर्भीय नाथ समाज संघ
साप्ताहिक सागर आदित्य/
स्मशानातील मसानजोगी यांना मासिक मानधन सुरू करावे - वैदर्भीय नाथ समाज संघ
कारंजा :- मृत्यूनंतर मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच स्मशानभूमीमध्ये मसनजोगी परिवार गेली कित्येक वर्षापासून विनामोबदला आपली मानवी सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षातील कोव्हिड 19 कोरोना महामारीच्या लढाईत सुद्धा त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संबंधित कोरोनाग्रस्त मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करून आपले कर्तव्य प्राणपणाने जपले आहे. परंतु शोकांतिका आहे की एवढे सर्व करून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची शासकीय मदत, मानधन अथवा सदर कामाचा भत्ता मिळत नसल्याने त्यांच्या पदरी मात्र निराशाच आहे. त्यामुळे त्यांची उपासमार सदृश्य परिस्थिती आज रोजी आपणास पहावयास मिळत आहे. तरी सुद्धा शासनाने आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्याधिकारी दादारावजी डोल्हारकर यांनी, सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून नाथपंथातील एक भाग असलेल्या कारंजा (लाड) शहरातील हिंदु स्मशानभूमीतील २४ तास स्वयंस्फूर्तीने आपले कर्तव्य बजावीत असलेल्या, मसणजोगी परिवाराला त्वरित मासिक सानुग्रह मानधन सुरू करण्यात यावे, याकरिता वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. दादारावजी डोल्हारकर साहेब यांना निवेदन यावेळी देण्यात आले. निवेदन देतेवेळी वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, मसनजोगी ओमप्रकाश शिंदे महाराज,नरेश शिंदे, शिवपाल शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण साप्ताहिक पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजयभाऊ कडोळे तसेच इतर नाथ बांधव उपस्थित होते.
0 Response to "स्मशानातील मसानजोगी यांना मासिक मानधन सुरू करावे - वैदर्भीय नाथ समाज संघ "
Post a Comment