
भा. मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे भीम जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..
साप्ताहिक सागर आदित्य
भा. मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे भीम जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..... भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 14 एप्रिल रोजी माननीय प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानाच्या अथांग महासागराला 134 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला मालार्पण करत पूजन करून अभिवादन केले. या आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी आम्हाला काय काय दिले हे सांगत असताना प्राचार्या मंजुषा सू.देशमुख मॅडम यांनी आपले विचार व्यक्त करताना कामाचे बारा तासावरून आठ तास केले, कामगार राज्य विमा, कामगाराला मिळणाऱ्या प्राथमिक सेवा, कामगार संघटनेची मान्यता दिली, भार पगारी सुट्टया , महागाई भत्ता , कायदेशीर संपाचा अधिकार , आरोग्य विमा, कामगार कल्याण निधी, स्त्री-पुरुष समानता, मुलींना समान अधिकार, महिला कामगार संरक्षण कायदा, मतदानाचा अधिकार, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे भारतीय संविधान ही एक सर्वात मोठी देन होय. अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला कृतीला आणि विचाराला त्रिवार अभिवादन करत आपले मत व्यक्त केले. या जयंती कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 Response to "भा. मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे भीम जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.."
Post a Comment