
रिसोड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती एकरी 20 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करा - गोपाल भिसडे पाटील
साप्ताहिक सागर आदित्य
रिसोड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती एकरी 20 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करा - गोपाल भिसडे पाटील यांची रिसोड चे तहसीलदार यांना निवेदना द्वारे मागणी
मागील एका आठवड्यापासून रिसोड तालुक्यात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतात सर्व पीक खरीप पिके नुकतीच उगवण्यास सुरुवात झाली असताना सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकाची कुजून पिकाची अतोनात हानी झाली आहे, पिकाची मोड झाली असून, शेतामध्ये पाणीच पाणी आहे,दुबार पेरणी करूनही अक्षरशः मुसळधार पाण्याच्या प्रवासाने व पाण्याच्या या थैमानामुळे या पिकाचे सगळीकडे नुकसान झाल्याची आपणास दिसून येते शेतकरी राजा संकटात सापडला असून अशावेळी संकटात असताना शासनाकडे आशेने बघत आहे, तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ प्रशासनास रिसोड तालुक्यातील सर्व खेडोपाडी जेथे जास्त नुकसान झाले तेथे पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश करावे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून प्रति एकरी 20 हजार रुपये तातडीची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा ही मागणी गोपाल पाटील भिसडे यांनी केली आहे,,
0 Response to "रिसोड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती एकरी 20 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करा - गोपाल भिसडे पाटील "
Post a Comment