
मेडशी येथे मध्य रात्री धाडसी चोरी दागीण्यासह १ लाख६६ हजार चोरीला
साप्ताहिक सागर आदित्य
मेडशी येथे मध्य रात्री धाडसी चोरी
दागीण्यासह १ लाख६६ हजार चोरीला
प्रतिनिधी मेडशी..
मेडशी येथे दि. 17 जुलै च्या मध्ये रात्री येथील माजी ग्रामपंचायत सदस्य ( व्यवसाय शेती ) दत्तराव श्रीराम घुगे व यांची आत्या शांताबाई गुणंवतराव गिते यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून. या मध्ये डागीण्यासह रोख रक्कम एक लाख सहासष्ट हजार रुपयांची चोरी जबर चोरी केली आहे.
या मध्ये दिड तोळ्याचे लाॅकेट, एक तोळ्याचे गंठन, होण्याचे लहान मुलाचे दागीणे, चांदीचे दागिने, नगदी बावीस हजार रुपये व एकोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरी करून पसार झाले आहे.
घटनेची माहिती रात्री मेडशी येथील पोलीस यांना देण्यात आली. तर चोरीची फिर्याद मालेगाव स्टेशनला देण्यात आली.
या नंतर सकाळी मालेगाव स्टेशनचे ठाणेदार किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हे करीत आहेत. तर या घटनेची पाहणी करून पंचनामा करून. या ठिकाणचे फिंगरप्रिंट घेण्यात आले. आहे.
तर या चोरीच्या घटनेमुळे मेडशी गावात दहशत पसरली आहे.
0 Response to "मेडशी येथे मध्य रात्री धाडसी चोरी दागीण्यासह १ लाख६६ हजार चोरीला"
Post a Comment