सहकारमहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंती निमित्त, अभिवादनासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड गोतावळा जमला !
साप्ताहिक सागर आदित्य/
सहकारमहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंती निमित्त, अभिवादनासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड गोतावळा जमला !
कारंजा : स्थानिक बाबासाहेब धाबेकर सभागृह कारंजा येथे, दि.१९ रोजी, सहकार नेते,सुनिल भाऊ धाबेकर यांच्या नेतृत्वात, हजारो चाहत्यांचा गोतावळा, एकत्र जमून यावेळी सर्वप्रथम सुनिलभाऊ धाबेकर, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, माजी न प .उपाध्यक्ष एम टी खान, माजी सभापती घुले, गणेशराव काळे, अढाऊ सर, सुरेश पाटील दवंडे, दहातोंडे पाटील, पत्रकार संजय कडोळे, प्रदिप वानखडे, एड संदेश जिंतुरकर, राजीक शेख, दत्ताभाऊ तुरक, विठ्ठलराव लाड इत्यादींसह सर्वच उपस्थितांनी, सर्वप्रथम शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे तसेच महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री, कारंजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, विकासाचे महामेरू सहकार महर्षी स्वबाबासाहेब धाबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ,हारार्पण तसेच पुष्पार्पण केले . यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वच उपस्थितांनी, आपल्या बाबासाहेबा सोबतच्या आठवणींना उजाळा दिला . "कारंजा मतदारसंघाचा विकास केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच कारकिर्दीत झालेला होता . त्यांच्याच कारकिर्दित गावखेड्यातील - वस्तीवाड्यातील सर्वसामान्य माणूस कारंजा शहराशी जोडला गेला. त्यांच्याच कारकिर्दीत खेड्यापाड्यावर डांबरीकरण - सामाजिक सभागृहे - शैक्षणिक संस्थाचा विकास व सर्वसामान्य नागरिकांची कामे अविलंब होत गेली .त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण प्रत्येकाच्या हृदयात अविरत तेवत राहात आहे . " स्व बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे प्रमुख वैशीष्ट्य म्हणजे, जातपात, धर्म, राजकिय पक्ष याच्या बंधनात न अडकता बहुतेक सर्वच राजकिय पक्षाचे कार्यकर्ते, हिंदु - मुस्लिम प्रत्येक जाती धर्माचे नागरीक, नेते - व्यापारी - शेतकरी - कामगार, पत्रकार मंडळी वगैरे केवळ बाबासाहेब धाबेकर यांचे चाहते म्हणून यावेळी उपस्थित होते . असे वृत्तसंकलनाकरीता गेलेले प्रत्यक्षदर्शी, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .
0 Response to "सहकारमहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंती निमित्त, अभिवादनासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड गोतावळा जमला ! "
Post a Comment