-->

जिल्हा प्रशासनच्या वतीने माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेच आयोजन

जिल्हा प्रशासनच्या वतीने माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेच आयोजन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा प्रशासनच्या वतीने माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेच आयोजन


"माझी माती माझा देश"  अभियानातंर्गत आज १७ ऑक्टोबर रोजी वाशीम जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुकास्तरावरुन आलेल्या कलशाचे संकलन करुन मातीला वंदन करण्यात आले.  त्यानंतर उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली. यावेळी वाशीम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उप जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वझिरे, उप जिल्हाधिकारी (भुसंपादन) नितिन चव्हाण, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी अमृत कलश यात्रेच्या जिल्हास्तरीय समारोपीय कार्यक्रमात सहभाग घेऊन मातीचे संरक्षण करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या देशातील शुर विरांना वंदन केले.

यावेळी अमृत कलशांसह जिल्हाधिकारी कार्यालय ते नगरपरिषद पर्यंत पायी  फेरी काढण्यात आली.  या फेरीमध्ये जिल्हाधिकारी बुवनेश्वरी आणि सीईओ वसुमना पंत पायी सहभागी झाल्या होत्या. या रॅलीचा समारोप न प च्या टेंपल गार्डन मध्ये करण्यात आला, नगर परिषदेच्या टेंपल गार्डन परिसरात वृक्षारोपण करून जिल्हास्तरीय अमृत रोप वाटिका तयार करण्यात आली. अमृत रोप वाटिकेमध्ये सदर कलश यात्रेचा समारोप करण्यात आला.


कलश यात्रा मार्गक्रमण करीत असतांना ठीकठिकाणी नागरिकांनी संकलन केलेली माती कलशामध्ये टाकून मातीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केले. दरम्यान हे अभियान देशासाठी आपले जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त करून या अभियानात शहरातील प्रत्येक प्रभागातील प्रत्येक नागरिकांनी योगदान दिले. 



कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी पंकज सोनवणे, कारंजा नगरपालिका मुख्याधिकारी दीपक मोरे, मुख्याधिकारी सतीश शेवदा, गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, जिल्हाधिकारी यांचे  स्विय सहाय्यक धर्मराज चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनवणे,  राम श्रृंगारे, अमोल कापसे, श्रीनिवास पवार, अनुराधा राऊत आदींची उपस्थिती होती. "भारत माता की जय, मेरी माती मेरा देश" अशा घोषणांनी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.

0 Response to "जिल्हा प्रशासनच्या वतीने माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेच आयोजन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article