-->

शालेय विद्यार्थी, वाहनधारक त्रस्त : काम पूर्णत्वासाठी ‘आप’चे बांधकाम विभागाला निवेदन

शालेय विद्यार्थी, वाहनधारक त्रस्त : काम पूर्णत्वासाठी ‘आप’चे बांधकाम विभागाला निवेदन



साप्ताहिक सागर आदित्य 

मुख्य रहदारीच्या मार्गावरील सिमेंटरस्त्याचे काम अपूर्ण!


शालेय विद्यार्थी, वाहनधारक त्रस्त : काम पूर्णत्वासाठी ‘आप’चे बांधकाम विभागाला निवेदन 


वाशिम – वाशिम शहरातील अकोला नाका ते रेखाताई राष्ट्रीय विद्यालयापर्यंतचा सिमेंट रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून अपूर्णावस्थेत आहे. परिणामी, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह या मुख्य रहदारीच्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या पाहता सदरील अपूर्ण सिमेंट रस्त्याचे काम बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ‘आप’च्यावतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगर परिषदेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्याची कामे सुरू आहेत. शहरातील बऱ्याच भागातील रस्त्याची कामे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी, नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याच भागात रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे अपघात देखील होत आहेत. 

शहरातील अकोला नाका ते पाटणी चौक हा मुख्य रहदारीचा मार्ग आहे. मात्र, या मार्गावर पाटणी चौक ते रेखाताई राष्ट्रीय विद्यालयापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय ते अकोला नाका या भागातील रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक त्रास रेखाताई राष्ट्रीय विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शहरातील नागरीकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद यांना देण्यात आल्या आहेत.

....

शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, अपूर्णावस्थेतील वानधारकांना पाठीच्या मणक्यांचे विविध आजार उद्भवणे, शालेय विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागणे, विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीच उपाययोजना केल्या जात नाही. ही समस्या पाहता ‘आप’च्यावतीने संबंधित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा  दि. ३० ऑक्टोबर पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. 

-राम पाटील डोरले, ‘आप’पदाधिकारी, वाशिम 


0 Response to "शालेय विद्यार्थी, वाहनधारक त्रस्त : काम पूर्णत्वासाठी ‘आप’चे बांधकाम विभागाला निवेदन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article