कारंज्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी केला नाना पटोलेंचा सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य/
कारंज्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी केला नाना पटोलेंचा सत्कार
कारंजा ( लाड ) - जगतगुरु श्री. संत सेवालाल महाराज यांच्या 283 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेतकरी शेत मजूर व सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी आक्रमकपणे कांग्रेस पार्टी ची भुमिका बजावणारे सर्वांचे लाडके नेते नानाभाऊ पटोले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी ह्या बंजारा समाजाच्या काशीत आगमन झाले असता कारंज्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी नाना भाऊ पटोले ह्यांचे स्वागत केले.
पोहरादेवी येथे जगतगुरु श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने धार्मिक विधी व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याकरिता म्हणुन प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले आले होते.
ह्यावेळी कारंजा शहर काँग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष अरविंद लाठीया , माजी तालुकाध्यक्ष निळकंठ गजभिये , वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर , मानोरा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष इफ्तेखार पटेल, रामबकस डेंडुले , पांडुरंग देशभ्रतार , लियाकत भाई मुन्नीवाले , अब्दुल राजिक शेख , युवक काँग्रेसचे चे आमीर पठाण , नदीम भाई , तौसीफ खांन , मोहम्मद मिजाॅ ,आनंद जोशी पत्रकार संजय कडोळे, प्रदिप वानखडे उपस्थित होते.
0 Response to "कारंज्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी केला नाना पटोलेंचा सत्कार"
Post a Comment