
धर्मयोध्दा डॉ . अनिल कावरखे जिल्हा शल्य चिकित्सक पदी ! निवड झाल्याबद्दल सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य
धर्मयोध्दा डॉ . अनिल कावरखे जिल्हा शल्य चिकित्सक पदी ! निवड झाल्याबद्दल सत्कार करताना वाहन चालक 102 संदिप फोफळे व सर्व वाहन चालक रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हेच ब्रीद असलेले वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ . अनिल कावरखे ह्यांची पदोन्नती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक पदी नियुक्ती वाशीम जिल्हामध्ये त्यांच्या निवडीमुले समाधान व्यक्त करण्यात आले आहे . वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदी असताना डॉ . अनिल कावरखे ह्यांनी २४ तासात कधीही कुणीही फोन वरून काही घटनेची माहिती दिली तर तत्पर रात्री बे रात्रीही मदतीला धावणारे डॉ . अनिल कावरखे महणुन ओळखले जाते . याचा अनुभवही हजारोंना आला आहे . साध्या व सरळ स्वभावाने व मुनाने रुग्ण लोकांस ते आपलेसे वाटतात . डॉक्टरी सेवेत त्यांची नाळ शहरापर्यंत मर्यादित न राहता थेट ग्रामीण भागातील जनतेपर्यंत जुळलेली आहेत . त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात आजारावर चांगला उपचार .. होईल असा विश्वास जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णांना ते आपलेसे वाटतात . सर्वसामान्यांच्या मदतीला ते २४ तास तत्पर असतात . रुग्ण सेवेत ईश्वर सेवा जरी मानत त्यांना कोरोणा काळात वाशीम जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अहोरात्र परिश्रम घेत सांभाळली . सात्यतने त्यांनी ह्या साथीच्या आजारांतून रुग्ण बरा होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती . अनेकांच्या आरोग्य समस्या त्यांनी मानसिक घिर देऊन आधार देत चूटकीनिशी सोडवल्या आहेत . आपल्या गोड बोलण्यानेच रुग्णांना अर्ध्याच्यावरी बरे करतात .
0 Response to "धर्मयोध्दा डॉ . अनिल कावरखे जिल्हा शल्य चिकित्सक पदी ! निवड झाल्याबद्दल सत्कार "
Post a Comment