-->

सौ. उषाताई नारायण वानखेडे यांची तंटा मुक्ती अध्यक्षा पदी बहुमताने निवड

सौ. उषाताई नारायण वानखेडे यांची तंटा मुक्ती अध्यक्षा पदी बहुमताने निवड

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिम जिल्ह्यातील सावरगाव जिरे येथे प्रथम महिला सौ. उषाताई नारायण वानखेडे यांची तंटा मुक्ती अध्यक्षा पदी बहुमताने निवड

वाशिम येथून जवळच असलेल्या सावरगाव जिरे येथे दिनांक 29/08/2023 रोजी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षा म्हणून सौ. करुणा गंगाराम पडघान सरपंच ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पं.स. सभापती गजाननराव भोने उपसरपंच अजय बिटोडे गंगाराम पडघान माजी त.मु. अ. श्यामभाऊ पडघान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन गायकवाड पोलिस पाटील काशिराम तडस माजी सरपंच दत्ता नागुलकर दिलीप काळे व सर्व ग्राम. प. सदस्य यांची उपस्थिती होती.सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ. उषाताई नारायण वानखेडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स. दा. राठोड यांनी काम पाहिले सौ. उषाताई नारायण वानखेडे यांची वाशिम जिल्ह्यातील प्रथम महिला तंटामुक्ती अध्यक्ष पदी म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Posts

0 Response to "सौ. उषाताई नारायण वानखेडे यांची तंटा मुक्ती अध्यक्षा पदी बहुमताने निवड"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article