
क्रीडा शिक्षकांची सभा उत्साहात
साप्ताहिक सागर आदित्य
क्रीडा शिक्षकांची सभा उत्साहात
मालेगाव:- येथील ना.ना.मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मालेगाव तालुक्यातील शालेय क्रीडा शिक्षकांची सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी सौ. संध्या उंबरकर(नेरकर) मॅडम ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पिदडी सर हे होते तसेच मंचावर तालुका क्रीडा संयोजक गजानन भिसडे सर हे सुद्धा उपस्थित होते. मुख्याध्यापक सुमेध तायडे सर हे सुद्धा उपस्थित होते.
सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद तसेच नारायणदासजी मुंदडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
यावेळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग घ्यावा या दृष्टिकोनातून अध्यक्ष सौ. संध्या उंबरकर मॅडम यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना आवाहन केले,तसेच प्रमुख पाहुणे पिदडी सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरून कोणताही विद्यार्थी खेळापासून वंचित राहणार नाही व प्रत्येक शाळेने तालुकास्तरापासून तर जिल्हास्तरावरच्या सर्व खेळांमध्ये सहभाग घ्यावा असे उद्बोधन केले.
यावेळी तालुक्यातील,रमेश कुटे सर,रामेश्वर वाळले,संतोष राठोड,गजानन माळेकर, विकास शिंदे, अनंत देशमुख, नितेश भिंगे, नितिन देशमुख, वैद्य सर, सौ.बयस मॅडम, सौ.वैद्य मॅडम, मिलिंद अढागळे, सेवाराम चव्हाण, राजेश्वर गायकवाड,रामेश्वर बाजड व इतर क्रीडाशिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश महल्ले तर आभारप्रदर्शन श्री.खराटे सर यांनी केले.*
0 Response to "क्रीडा शिक्षकांची सभा उत्साहात"
Post a Comment