
वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखाचे उद्घाटन संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
पंचशील नगर वाशिम येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखाचे उद्घाटन संपन्न. पंचशील नगर वाशिम येथे वंचित बहुजन युवा आडीची शाखा स्थापनेचा कार्यक्रम डॉ. सिध्दार्थ देवळे वंचित बहुजन आघाडी पश्चीम विदर्भ अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात मोठ्या थाटात पार पडला या वेळी सोनाजी इंगळे जिल्हा महासचिव ,ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष,केशवराव उचे तालुका उपाध्यक्ष,सागर भाऊ इंगळे शहार अध्यक्ष,मोनुभाऊ सुरवाडे वंचित बहुजन युवाशहराध्यक्ष,राहुल भाऊ बलखंडे, कविनंद गायकवाड, प्रा.इंगळे ,रोहित भाऊ बडेल, पद्माबाई जगताप,राधाबाई धबाले व समस्त पंचशील नगर मधील महिला व पुरुष, ज्येष्ठ नागरिकासह युवा वर्गा मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते या वेळी महापुरुषांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून युवा शाखाचे उद्घाटनानंतर डॉ.सिद्धार्थ देवळे यांनी मार्गदर्शनात हे भांडवलशाहीचे सरकार उलथून टाकण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे यांनी गोर गरीब आणि कष्टकरी, कामगारांच्या उद्धारासाठी प्रत्येक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून दिला तरच हे संविधान टिकेल नसता गुलामगिरी येण्याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जोतीताई इंगळे यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष इथल्या पंच्याशि टक्के जनतेच्या न्याय हक्कासाठी काम करणारा पक्ष आहे. प्रस्थापित आणि घराणेशाही पोसणाऱ्या पक्षाच्या लोकांना बाळासाहेब आंबेडकर यांची धास्ती असल्यामुळे जातीपातीच्या राजकारणाचे नवे वळण देऊन हा पक्ष फक्त बौद्धाचा असल्याचा अपप्रचार करुन सामाजिक सलोखा बिघडत आहेत या पासून जनतेनी सावध राहुन वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले. जेष्ठ नेते पी एस खंडारे यांनी महापुरुषांचे कार्य आणि आत्ताची सामाजिक व राज
0 Response to "वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखाचे उद्घाटन संपन्न. "
Post a Comment