श्री संत सेवालाल महाराज यांच्या 283 व्या जयंती निमित् भव्य रक्तदान शिबिर संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित् भव्य रक्तदान शिबिर संपन्न
कारंजा :श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन श्री संत सेवालाल महाराज मंदिर बालाजी नगरी भाग -१ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारंजा लाड येथिल प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. निलेश भाऊ चव्हाण साहेब तर प्रमुख पाहुणे अस्थिरोग तज्ञ डॉ . आशिष आडे साहेब . सर्जन डॉ. सचिन राठोड साहेब डॉ. खेमनर साहेब . दंतरोग तज्ञ पियुष जाधव . स्रीरोग तज्ञ डॉ. वनश्री आडे मॅडम डॉ. आशिष राठोड . डॉ. पवन चव्हाणसाहेब, डॉ संगीता चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . यावेळी उपस्थितांना डॉ. निलेश चव्हाण यांनी रक्तदाना विषयी व संत सेवालाल महाराज यांच्या जिवन चरित्रा वर मोलाचे मार्गर्शन केले .विलासभाऊ राठोड यांनी प्रास्तविक व किशोर धाकतोड सर यांनी मार्गदर्शन केले या शिबिराला भिकासिंग नायक, विलासभाऊ राठोड . आर पी. राठोड . अरुण राठोड डॉ. केशव पवार . संतोष राठोड ,मनोज राठोड, चैतराम राठोड, विष्णू आडे साहेब दिनेश राठोड श्री चेतन राठोड विधाता चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सुरज मुंदडा, रमेश देशमुख, पवन राठोड, गोलू जाधव व बरेच जेष्ठ मंडळी नव युवक तरुण मंडळी महिला भगिनी व जिव्हाळा आरोग्य ग्रुपचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते दिनेश राठोड यांनी सर्वांचे आभार मानले .
0 Response to "श्री संत सेवालाल महाराज यांच्या 283 व्या जयंती निमित् भव्य रक्तदान शिबिर संपन्न"
Post a Comment