सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात समाजकल्याण समान संधी केंद्राचे उदघाटन
साप्ताहिक सागर आदित्य/
सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात समाजकल्याण समान संधी केंद्राचे उदघाटन
वाशिम - श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशीम द्वारा संचालित श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशीम व समाजकल्याण कार्यालय वाशीम याच्या संयुक्त विद्यमानाने समान संधी केंद्राचे उदघाटन दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ला उदघाटन संपन्न झाले. विद्यार्थी विकास विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजकल्याण विभागाचा उद्देश विद्यार्थ्यांचा गुणवत्ता व कौशल्य विकास वाढीसाठी प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्राची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य झाले पाहिजे या दृष्टिकोनातून या केंद्राची स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर वहाने प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. संजय साळीवकर , प्रा. वसंत राठोड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंढरी गोरे यांनी केले व त्यांनी समान संधी केंद्र व त्यांची कार्य याविषयी विद्यार्थ्यांना प्रास्ताविकेतून माहिती दिली. प्रा. डॉ. संजय साळीवकर यांनी संविधानाने आपल्याला समान संधी प्राप्त करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. आणि आपण प्रत्येक क्षेत्रात संधी शोधत असतो. समाजकार्य क्षेत्र आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना समान संधी प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले.
0 Response to "सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात समाजकल्याण समान संधी केंद्राचे उदघाटन "
Post a Comment