-->

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


साप्ताहिक सागर आदित्य/

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मेट्रिक शिष्यवृत्ती ( इयत्ता १ ली ते १० वी ) , बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ( इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुली ) , राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( इयत्ता ९ वी ते १२ वी ) , दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ( इयत्ता ९ वी व १० वी ) या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे . अधिक माहितीसाठी www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी . अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे , असे आवाहन शिक्षण संचालक ( योजना ) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे .

Related Posts

0 Response to "शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article