"एम ए इंग्लीश विषयात जिल्ह्यातून सर्वप्रथम आणि राज्यातून पाचवी मेरीट येण्याचा मिळवीला कु. राधीका सावके हिने सन्मान !"
साप्ताहिक सागर आदित्य/
समाजसेवी किरण सावकेंची पुतनी कु .राधीका सावकेचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक
"एम ए इंग्लीश विषयात जिल्ह्यातून सर्वप्रथम आणि राज्यातून पाचवी मेरीट येण्याचा मिळवीला कु. राधीका सावके हिने सन्मान !"
कारंजा (लाड) : ग्रामिण भागातील उत्कृष्ट हॉलीबॉलपटू आणि कवयित्री असलेल्या, अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलीने कु . राधीका गजानन सावके हिने अमरावती विद्यापिठातून एम ए इंग्लीश (साहित्य) विषयात, राज्यातून पाचवी तर जिल्ह्यातून पहिली येण्याचा सन्मान मिळवीला असून 'सावके' कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे . त्याबदल तीचे सर्वत्र कौतुक - अभिनंदन होत आहे . "मुलगी नकोशी " म्हणणार्याला ही चांगलीच चपराक असून, मुलीने प्राविण्य मिळविले तर मुलापेक्षाही कतृत्ववान होऊ शकते हे आजपर्यत अनेक मुलीनी सिद्ध केले आहे . हे अनेकवेळा सिध्द झालेले आहे . वाई येथील समाजसेवी असलेले कारंजा येथील कुशल मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षक किरण सावके यांनी आपल्या कु . राधीका गजानन सावके ह्या पुतनीने मिळविलेल्या यशाबद्दल अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला आहे . भविष्यात प्राध्यापिका होणाऱ्या कु राधीकाने "बेटी बचाव बेटी पढाओ " हा शासनाचा राष्ट्रीय कार्यक्रम राबविणार असल्याचे कळवीले आहे .
0 Response to ""एम ए इंग्लीश विषयात जिल्ह्यातून सर्वप्रथम आणि राज्यातून पाचवी मेरीट येण्याचा मिळवीला कु. राधीका सावके हिने सन्मान !""
Post a Comment