धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे ह्यांनी घडवीले माणुसकीचे दर्शन !
साप्ताहिक सागर आदित्य/
धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे ह्यांनी घडवीले माणुसकीचे दर्शन !
( वृद्ध महिलेला दिला मदतीचा हात )
कारंजा लाड - खाकी वर्दी दिसली की दहशत , भीती व दंडुका डोळ्यासमोर येते पण पोलिसांची दुसरी बाजू मात्र समोर येत नाही .शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून लक्ष केंद्रित करतात अश्या त्यांच्या धकाधकीच्या जीवनातही अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी आपलं माणुसकी चं नातं विसरत नाही,
ठाणेदार अनिल ठाकरे हे नेहमीच जनतेच्या मनात असुन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विषयी ची भीती ची भावना जनतेच्या मना तुन घालविण्यासाठी व मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात .
अनिल ठाकरेचे हे प्रेमळ रुप पाहून जनता द्वारे त्यांचं अभिनंदन केल्या जातं आहे . त्यांच्या या समाजसेवी कार्याबद्दल महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचं आभार मानले.
0 Response to "धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे ह्यांनी घडवीले माणुसकीचे दर्शन !"
Post a Comment