
सनराईज ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
सनराईज ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा
मालेगाव :तालुक्यातील सनराईज ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. सदानंद सुर्वे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सिद्धार्थ भालेराव प्रा. विनिता साबळे मॅडम होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजना सोबतच वृक्षाला जल टाकून महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी भाषणे दिली प्रमुख पाहुणे प्रा. सिद्धार्थ भालेराव प्रा. वनिता साबळे मॅडम यांनी सुद्धा आपल्या भाषणातून मराठीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितली आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. सदानंद सुर्वे यांनी वि.वा शिरवाडकर यांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपला संवाद मराठी भाषेत व्हावा विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी ,नाटक, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक वाङमयीन साहित्य वाचावे मराठी साहित्यामधून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते मराठी भाषा टिकली तर संस्कृती टिकेल साहित्य संवर्धना बरोबरच पर्यावरण संवर्धनाची शिकवण विद्यार्थ्यांना द्यावी म्हणजे वृक्ष टिकले तर माणूस टिकेल हा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.बालाजी गवळी सर यांनी केले.
0 Response to "सनराईज ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा"
Post a Comment